उत्तूर (प्रतिनिधी) – दुर्गम भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, उत्तूर यांनी पुन्हा एकदा शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या चार वर्षांपासून ही संस्था अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, दप्तर, डबा, पेन यासारखे शैक्षणिक साहित्य मोफत पुरवते. यंदा या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे.
सदर उपक्रमासाठी अशी मुले-मुली शोधण्यात येत आहेत –
ज्यांचे आई-वडील हयात नाहीत
परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे
विद्यार्थी हुशार व शिकण्याची तीव्र इच्छा बाळगणारे आहेत
अशा विद्यार्थ्यांची माहिती थेट संपर्क करून किंवा स्थानिक शिक्षक, समाजसेवक, ग्रामस्थ यांच्या माध्यमातून संस्थेकडे पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसंघाने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले.
या उपक्रमात ग्रुपचे सदस्य वैभव गुरव, गोपी देसाई, ऋतिक रेडेकर, फिरोज मुल्लानी, ओमकार खडे, रणजित घेवडे, प्रितेश पटेल , अभिषेक जाधव, संतोष गाडीवडर, मनोज भाईंगडे, प्रथमेश तेली, निलेश जाधव, स्वप्निल मांडे आदी होते.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक