आजरा (हसन तकीलदार):
घरेलू कामगारांना कायदेशीर अधिकार व संरक्षण मिळावे, यासाठी जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरेलू कामगार मंडळाची स्थापना तात्काळ करावी, अशी ठाम मागणी घरेलू कामगार संघटनेचे नेते कॉ. संग्राम सावंत यांनी केली आहे.
सन २०१० मध्ये जिनेव्हा येथे अंतरराष्ट्रीय श्रम संघटना (ILO) ने घरकामगारांच्या प्रश्नांवर आयोजित केलेल्या परिषदेत १८९ क्रमांकाचा ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये घरकाम हे “कामगारांचे अधिकृत कार्य” असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. भारतानेही या ठरावाला मान्यता दिली, मात्र आजतागायत घरकामगारांसाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक असा केंद्रीय कायदा अस्तित्वात आलेला नाही.

उत्तराखंडमधील एका आदिवासी महीला घरकामगाराच्या शोषणाच्या प्रकरणातून सुरू झालेल्या फौजदारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाची गंभीर दखल घेत २९ जानेवारी २०२५ रोजी केंद्र सरकारला सहा महिन्यांत गृहकामगार संरक्षण समिती स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. या समितीची मुदत २६ जुलै २०२५ रोजी संपत आहे.
या पार्श्वभूमीवर १६ जून – आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन या दिवशी देशभरात घरकामगार संघटनांमार्फत विविध कार्यक्रमांतून ही मागणी लावून धरण्यात येणार आहे.
घरकामगार संघटनेच्या प्रमुख मागण्या:
राज्यात तालुका पातळीपर्यंत घरकामगारांची नोंदणी करणारी सक्षम यंत्रणा तयार करा.
जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय घरेलू कामगार मंडळ स्थापन करा.
या मंडळात घरकामगार संघटनांना प्रतिनिधित्व द्या.
भांडी वाटप व सन्मानदार अनुदान त्वरीत पूर्ण करा.
कायद्यातील तरतुदींनुसार घरकामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, महिलांसाठी अपघात विमा, औषधोपचार खर्च यांचा लाभ द्या.
राज्य कामगार विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, वृद्धापकाळ पेन्शन लागू करा.
किमान वेतन, साप्ताहिक व विशेष रजा, बोनस याचे कायदेशीर हक्क मान्य करा.
कल्याण मंडळासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी लेव्ही व गृहवस्तूंवरील कर आकारा.
एजन्सी व कंपन्यांद्वारे होणाऱ्या शोषणावर नियंत्रण ठेवा.
या मागण्यांवर आधारित निवेदनावर कॉ. संग्राम सावंत, लक्ष्मी कांबळे, भारती पवार, सारिका चव्हाण, रेश्मा कांबळे, कविता चव्हाण, मंदा चव्हाण यांच्यासह इतर सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक