Homeघडामोडीशालेय मुलींच्या हस्ते ध्वजारोहण

शालेय मुलींच्या हस्ते ध्वजारोहण

आजरा – आजरा तालुक्यातील भादवण या गावी भादवण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त शिलालेख व भारतमाता प्रतिमा पूजन लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी रणजित गाडे व ग्रापंचायत सदस्या यांच्या हस्ते झाले.


यावेळी गाडे यांच्या संकल्पनेतून शालेय मुलींना ध्वजारोहणाचा मान दिला. तसेच जिल्हा क्रीडा स्पर्धेत खो – खो व वयक्तिक स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्ध्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गौरव केला. आदर्श विद्या मंदिर भादवण आणि भादवण हायस्कूल , भादवण च्या विद्यार्ध्यानी देशभक्ती पर नृत्य , मानवी मनोरा, लेझिम असे विविध उपक्रम सादर करण्यात आले.


यावेळी उपसरपंच संजय पाटील ग्राम पंचायत सदस्य, सेवा सोसायटी संचालक, तंटामुक्त समिती, शाळा व्यवस्थापन समिती, देवस्थान समिती विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळेंचे मुख्याध्यापक , शिक्षक व विद्यार्थी, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील,अंगणवाडी कर्मचारी, भादवण ग्रामस्थ व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular