Homeघडामोडीदहा एच. पी. कृषी पंपासाठीही विद्युत सवलत द्या - आजरा तालुका सरपंच...

दहा एच. पी. कृषी पंपासाठीही विद्युत सवलत द्या – आजरा तालुका सरपंच परिषद मुंबई यांची मागणी


वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह इतरांनाही दिले निवेदन
आजरा (हसन तकीलदार ):-ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांचेकडून शेतकऱ्यांसाठी साडेसात एच. पी. च्या कृषी पंपासाठी सर्वत्र विद्युत सवलत देण्यात आली आहे. परंतु आजरा, चंदगड, राधानगरी आणि भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या तालुक्यांचा विचार करता येथील भौगोलिक परिस्थिती फार विपरीत आहे. नदीपात्रातील पाणी शेतापर्यंत नेताना जादा हॉर्स पॉवरच्या कृषीपंपांची गरज भासते. त्यामुळे या तालुक्यामधून 7•5एच पी. च्या पंपाने गरज भागत असली तरी शेतापर्यंत पाणी पोहचत नसलेने तांत्रिक बाबींमुळे 10एच. पी. पंप बसवणे शेतकऱ्यांना अनिवार्य बनले आहे. त्यामुळे 7•5एच. पी. च्या अटीमुळे शेतकऱ्यांना या वीजसवलतीच्या योजनेचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे 10एच. पी. च्या कृषी पंपासाठही 7•5 एच. पी. प्रमाणे विद्युत सवलत योजनेचा लाभ मिळावा असे निवेदन उपभियंता आजरा विद्युत कंपनी तसेच एका कार्यक्रमासाठी आलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनाही आजरा तालुका सरपंच परिषद मुंबई यांनी दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, उपरोक्त तालुके हे डोंगराळ भागात येतात. या तालुक्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता नदीपत्रापासून शेती ही डोंगर भागात उंचावर असल्याने 7•5 एच. पी. पंपाने शेतीच्या पाण्याची गरज भागत असली तरी तांत्रिक बाबींमुळे पाईप लाईन हेडचा विचार करता 10 एच.पी. चा कृषी पंप शेतकऱ्यांना बसविणे अनिवार्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदरची योजना केवळ 7•5एच. पी. धारकांना असल्याने 10 एच. पी. असणाऱ्या शेतीपंप धारकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. यामुळे सदरच्या योजनेसाठी आजरा, चंदगड, राधानगरी आणि भुदरगड या डोंगराळ भागातील चढाचा विचार करून 10 एच. पी. शेतीपंप धारकांनाही या विद्युत सवलत योजनेचा लाभ द्यावा तसेच काही शेतकऱ्यांना स्वखर्चाने वीज खांब उभारणी करून वीज जोडून घ्यावी लागते. त्यासाठीची शेतकऱ्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत फेड होण्यासाठी विद्युत वितरण कंपनीबरोबर करारनामा केला जातो. सदरच्या सवलतीच्या योजनेचा विचार करता शेतकऱ्यांनी केलेल्या गुंतवाणुकीचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून डिपॉझिट केलेली रक्कम परतावा डिपॉझिट करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपभियंता व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याबरोबरच मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, पालक मंत्री यांनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी आजरा तालुका सरपंच परिषद,मुंबई चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!

आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular