Homeघडामोडीपवित्र प्रणाली टप्पा दोनच्या शिक्षक भरती अभियोग्यधारकांना न्याय द्या. कॉ. शिवाजी गुरव

पवित्र प्रणाली टप्पा दोनच्या शिक्षक भरती अभियोग्यधारकांना न्याय द्या. कॉ. शिवाजी गुरव

आजरा (हसन तकीलदार): पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यताधारक शिक्षकांच्यावर अन्याय झाला असून खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाल्याने अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा अशी मागणी कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, पवित्र प्रणालीमार्फत टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यताधारक शिक्षकांच्या वर अन्याय झालेला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया चुकीची झाली असून संस्था चालकांच्यासह अभियोग्यताधारकही कमालीचे नाराज झाले आहेत. पवित्र प्रणाली असे गोंडस नाव दिले मात्र ते फसवे निघाले. ना संस्थाचालकांच्या मनासारखे ना अभियोग्यता धारकांच्या मनासारखे झाले आहे. अभियोग्यता धारकांच्याकडून त्यांना पात्र असणाऱ्या शाळांची यादी दिली त्यामध्ये त्यांनी पसंती क्रम दिले, पसंती क्रम देताना साहजिकच स्वतःचा तालुका त्यानंतर स्वतःचा जिल्हा व त्यानंतर जवळचा जिल्हा असे पसंती दिली.


मात्र या दिलेल्या जिल्ह्यांपैकी विरुद्ध मोजणी करून या जिल्ह्यातील उमेदवार लांबच्या जिल्ह्यात लांबच्या जिल्ह्यातील त्याहीपेक्षा लांबच्या जिल्ह्यात उदाहरणार्थ लातूरचा उमेदवार सातारा जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्याचा उमेदवार सोलापूर जिल्ह्यात असे जाणीवपूर्वक केल्याची बोलले जात आहे. तसे झाल्याने संस्थाचालकांनी अध्यापनाचे काम थांबू नये म्हणून बऱ्याच पात्र शिक्षकांची नेमणूक पाच वर्षे ते सात वर्षे काहींनी दहा वर्ष आधीच केलेली असते त्यांनी पसंती क्रम दिलेला असतो मात्र एकूण रिक्त जागेपैकी एकही उमेदवार मुलाखतीच्या यादीत आलेला नाही असा बऱ्याच संस्थांना अनुभव आला आहे. त्यामुळे बऱ्याच संस्थांनी मुलाखतीसाठी उमेदवार आपल्याकडे आलेच नाहीत असे रेकॉर्ड करून पवित्र प्रणाली मार्फतच शासकिय यंत्रणेला कळवले आहे. त्यामुळे लांबच्या जिल्ह्यात मुलाखतीसाठी जाऊन सुद्धा अभियोग्यताधारक तेथे गेलेच नाहीत असे समजले जाते. याबाबत पवित्र प्रणाली यंत्रणेने कोणतीही नोंद ठेवलेली नाही त्यामुळे सहाजिकच त्या अभियोग्यता धारकांवर फार मोठा अन्याय झाला आहे.


या भरती प्रक्रियेत मुलाखती घेताना नियमाप्रमाणे पाठ निरीक्षण व मुलाखतीच्या वेळी निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता व्हिडिओ रेकॉर्ड करून जतन करणेबाबत सूचना आहेत असे असताना मात्र बऱ्याच ठिकाणी ऑन कॅमेरा मुलाखती झाल्याच नाहीत याबाबत निवड समितीने कोणतीच पर्यायी व्यवस्था दिली नाही. वास्तविक १:१० उमेदवार मुलाखतीसाठी देऊन ०९ अभियोग्यता धारक उमेदवारांची फरपट केली आहे. जि.प भरती मध्ये ज्याप्रमाणे थेट नियुक्ती केली जाते त्याप्रमाणे खाजगी संस्थांमध्येही थेट नियुक्ती करावी अशी मागणी अभियोग्यताधारकांची आहे.


अभियोग्यता धारकांचे फार मोठे हाल करून संस्थाचालकांना १:१० उमेदवार देऊन संस्थेला मदत मिळण्याची मुभा दिली आहे. जो उमेदवार थेट दिला असेल त्यांच्याकडून देखील इच्छेने मदत घेता येणे शक्य आहे. मात्र तसे न करता भरतीचा खेळ खंडोबा चालू आहे तो बंद करून जिल्हा परिषदेच्या भरती प्रमाणे थेट नियुक्ती करण्यात यावी किंवा जिल्हास्तरावर उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. या प्रक्रियेत संस्थांना विश्वासात घेण्यात यावे किचकट प्रक्रिया बंद करून अभियोग्यता धारकांना न्याय देऊन त्यांची फरपट थांबवावी. वास्तविक नियमाने प्रकल्पग्रस्तांची जागा थेट भरती करावी लागते ती भरण्यात यावी त्यांना मुलाखतीची आवश्यकता नाही, प्रकल्पग्रस्तांची आधीच फरपट झालेली असते त्यांच्या जीवनातील उपजीविकेचे साधन प्रकल्पासाठी गेलेली जमीन त्यांच्या पुनर्वसनाचा झालेला विलंब हे देखील शासनाने विचारात घेणे गरजेचे आहे. त्यांच्या योग्यतेनुसार थेट नियुक्ती देण्याची गरज आहे. राहिलेली पुढील भरतीची प्रक्रिया जलद गतीने राबवून अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनाच्या प्रती शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचनालय, पुणे, व विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनाही देण्यात आल्या आहेत.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular