आजरा (अमित गुरव ):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्यामार्फत ऊस पुरवठादार आणि दहा हजारच्या वर शेअर्स रक्कम असणाऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वितरण करण्याचे काम सुरु आहे. परंतु कमी शेअर्स रक्कम असणाऱ्या व कारखाना स्थापनेच्यावेळी मदत केलेल्या सभासदांना साखर मिळणार नसलेने त्यांच्यावर अन्याय होणार आहे त्यामुळे या विरोधात एकत्र येऊन आंदोलन छेडणार अशा आशयाचे निवेदन कोरीवडे ता. आजरा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांनी कारखान्याला दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याची स्थापना करीत असताना अनेक सभासदांनी आपल्याकडे शेअर्स रक्कम जमा केलेली आहे. पाचशेहे पासून ते दहा हजार पर्यंत शेअर्स रक्कम आपल्याकडे जमा आहेत. पण साखर वाटप करताना तुम्ही दहा हजारच्या वरील शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदांना साखर वाटप करण्याचे आपले धोरण हे अन्यायकारक आहे. पंचवार्षिक निवडणूकीला सामोरे जात असताना आपल्याकडून सर्व सभासदांना साखर वाटप करण्याचे वचन दिले होते पण भागभांडवल वाढवण्याच्या नादात तुम्ही बहुतांश सभासदांवर अन्याय करीत आहात. त्यामुळे कारखान्याच्या सरसकट सभासदांना साखर वाटप करा अन्यथा आमची शेअर्स रक्कम व्याजासहित परत करा अशी मागणी आम्ही अन्यायग्रस्त सभासदांमार्फत करणार आहोत. मतदानासाठी पाचशेहे पर्यंतची सभासद तुम्हाला चालतात आणि तेच सभासद साखर वाटपासाठी चालत नसतील तर आमची शेअर्स रक्कम व्याजासहित परत करा अन्यथा वंचित आणि अन्यायग्रस्त सभासदांना संघटित करून तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
अश्याच बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक वरून चॅनेल फॉलो करा..
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक