Homeघडामोडी“श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत आरोग्य शिबीर

“श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत आरोग्य शिबीर

आजरा(हसन तकीलदार): तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या मार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमेअंतर्गत विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरांमध्ये नागरिकांना आधार व गोल्डन कार्ड नोंदणी, नेत्रदान व अवयव दान जनजागृती, तसेच कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून सल्ला व उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

या उपक्रमात शिरसंगी, दाभिल, कासार कांडगाव, पारेवाडी, वेळवटी, गवसे व पोळगाव उपकेंद्रांचा सक्रिय सहभाग राहिला. शिबिरांच्या आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका व आरोग्य सेवक/सेविका यांनी विशेष मेहनत घेतली.

या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढून निरोगी समाजाची दिशा ठळकपणे अधोरेखित झाली.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular