Homeघडामोडीकोल्हापूर जिल्हात पावसाचा जोर , पंचगंगा इशारा पातळी गाठत आहे

कोल्हापूर जिल्हात पावसाचा जोर , पंचगंगा इशारा पातळी गाठत आहे

कोल्हापूर (प्रतिनिधी ) -: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फूट १ इंचापर्यंत गेली आहे. पंचगंगा इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फुटांवर आहे. जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular