आजरा(हसन तकीलदार):- येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये हिंदी राजभाषा दिनानिमित्त मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले..
विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर हिंदी विषय शिक्षक डी. आर. पाटील आणि श्रीम.आर एन पाटील यांनीही हिंदी दिनाचे महत्त्व आणि मुंशी प्रेमचंद यांचे विषयी आपले विचार मांडले.

यावेळी हिंदी विभागातील सौ. एस. डी.इलगे, श्रीम.आर एन.पाटील, सौ. देसाई एस. वाय., डी. आर.पाटील , व्ही.टी. कांबळे, सौ. ढेकळे एस.पी., श्रीम. बिल्ले एम. व्ही.तसेच या कार्यक्रमाचे आयोजक वर्ग इयत्ता दहावी (ड )व वर्गशिक्षिका सौ. एस. टी.पाटील मॅडम, प्राथमिकचे मुख्याध्यापक आर. व्ही.देसाई तसेच सर्व व्यंकटराव परिवार व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी व्ही पाटील यांनी केले व आभार श्री व्ही.टी कांबळे यांनी मानले.
“ताज्या मराठी घडामोडी आणि नानाविध व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच Link Marathi चॅनेल Subscribe आणि Follow करा!” 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



