उत्तूर ( प्रतिनिधी ) – उतूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल तडका चे मालक आणि तरुण व्यावसायिक प्रमोद नामदेव महाजन (वय ३२) यांनी घरातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना सोमवार, दि. १० जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास प्रमोद यांचा त्यांच्या आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. वादानंतर संतापाच्या भरात त्यांनी घरी ठेवलेले विषारी औषध प्राशन केले.
यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना गडहिंग्लज येथील सेवासदन रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र तब्येत गंभीर असल्याने गुरुवार, दि. १३ जून रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृत्यूपूर्वी प्रमोद महाजन यांनी स्वतःच पोलीसांसमोर जबाब नोंदवला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,
“मीच विष घेतले असून माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये.”
या प्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (A.D.) ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
स्थानिक व्यावसायिक व परिचितांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!
📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH
महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

मुख्यसंपादक



