गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजसह चंदगड आणि आजरा तालुक्याच्या विकासाला गती द्यायची असल्यास विकासाची दृष्टी आणि व्हिजन असणारं नेतृत्व विधानसभेत गेलं पाहिजे. गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढून पुढच्या पन्नास वर्षाचं प्लॅनिंग असणारा नेता निवडण्याची काळाची गरज आहे. त्यामुळेचं ज्यांनी दौलतचं शिवधनुष्य पेलले, अशा विकासाची दृष्टी आणि काम करण्याची क्षमता असणाऱ्या मानसिंग खोराटे यांना निवडून देऊया असं आवाहन गोडसाखरचे माजी चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी केलं.
विधानसभा निवडणुकीतील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज पूर्व भागातील मुत्नाळ येथे शहापूरकर गटाचा व खोराटे समर्थकांचा मेळावा पार पडला. मोठ्या प्रतिसादात यावेळी खोराटे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी गोडसाखर संचालक अरुण गवळी, मुत्नाळ सरपंच पूजा कोरे, सरपंच संघटना अध्यक्ष बसवराज आरबोळे, गोड साखर संचालक भरमु जाधव , आनंदराव जाधव, चंदगड बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. संतोष मळवीकर, बी.के. काळापगोळ, गडहिंग्लज तालुका संघ संचालक मल्लाप्पा कल्याणी, सेवा संस्था हेब्बाळचे चेअरमन राजेंद्र गवळी, उपसरपंच सुरज गवळी, युवराज नाईक, अक्षय पाटील, प्रमोदगिनी खातेदार,रामगोंडा गोडसे, संजय मिरजेओमकार घबाडे, केतन पाटील, उमाकांत मदकरी, मलाप्पा गुंनगुंजी, राजू चव्हाण, अभिजीत कुलकर्णी, राजू चव्हाण, भीमराव चौगुले, वीरेंद्र चौगुले, आनंद गुरव, उमेश रामजी, अजित कबुरी, संजय घस्टी, दुंडापा मादकरी, मंजुनाथ बंदी, सुनील नांगरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अजित दावणे यांनी केले.
यावेळी खोराटे म्हणाले, मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. तीन तालुक्यांचा समावेश होत असल्याने संपूर्ण भागाचा विकास करणं गरजेचं आहे. मात्र, आजपर्यंत तसं झालेलं दिसतं नाही. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास त्या पद्धतीचं प्लॅनिंग आणि व्हिजन हवं आहे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं व्हिजन काय आहे हे आधी ठरवलं पाहिजे. त्यामुळे याचा सारासार विचार करून मतदारसंघाची विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. फक्त आणि फक्त मतदारसंघाचा शाश्वत विकास याच मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे आपल्या मुलाच्या, लेकीबाळींच्या उज्वल भविष्यासाठी मला साथ द्या, संधीचं सोन करून दाखवतो असा विश्वास मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला.-
दौलतला नवसंजीवनी देणारे खोराटे नक्कीच गडहिंग्लजचा विकास करतील-
डॉक्टर शहापूरकर म्हणाले, मानसिंग खोराटे हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी एकदा ठरवलं तर ते करतातच. त्यांनी आपल्या मेहनतीने एक व्यावसायिक ते यशस्वी उद्योजक अशी मजल मारली आहे. स्वकष्टाने त्यांनी बंद पडलेला दौलत साखर कारखाना पुन्हा सुरू केला नाही तर तो राज्यात टॉप पाचमध्ये आणला. कोणतही राजकीय पद नसताना फक्त विभागातील दीड हजार बेरोजगार युवक युवतींना नोकरी देण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने उद्योग क्षेत्रात काम करत आहेत, ते पाहता नक्कीच मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न तेच मिटवू शकतात. खोराटे यांनी मतदारसंघात हलकर्णी तसेच शेंद्रि एम.आय.डी.सी.मध्ये उद्योग आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना केवळ रोजगार द्यायचे नाहीत तर उद्योजक घडवायचे आहेत. त्यासाठीही ते प्रयत्नशील असून लवकरच उद्योजकता मेळावा घेणार आहेत. त्यामुळे त्यांचे विकासाचे व्हिजन आणि मतदारसंघासाठी असलेली तळमळ पाहून गडहिंग्लज भागाचा विकास करण्यासाठी त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे डॉ. शहापूरकर म्हणाले.
मुख्यसंपादक