चंदगड: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचा भव्य जाहीर जनसंवाद मेळावा चंदगडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपल्या संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले.
या मेळाव्यात प्रमुख उपस्थितांनी मातंग समाजाच्या बांधवांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न-समस्या जाणून घेतल्या. विविध सामाजिक व आर्थिक समस्या, शिक्षणाची गुणवत्ता, बेरोजगारी, विकासात्मक योजनांचा अभाव, आरक्षणाचे मुद्दे यांसारख्या विषयांवर समाज बांधवांनी आपली मते व्यक्त केली. यानुसार भविष्यात त्या योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमा वेळी मानसिंग खोराटे बोलताना म्हणाले चंदगड विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाच्या बांधवांनी आपल्या शाश्वत विकासात्मक दृष्टिकोनाला समर्थन देत, एकजूट दाखवत, समाजाच्या हितासाठी महत्त्वाच्या मुद्यांवर उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या जनसंवाद मेळाव्यात उपस्थित असलेल्या मातंग समाजाच्या बांधवांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील माझ्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा दर्शविला. आगामी निवडणुकीत चंदगड विधानसभेसाठी उभे असलेल्या मानसिंग खोराटे साहेबांना जाहीर पाठींबा देण्याचा निर्णयही या मेळाव्यात घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी असलेल्या श्री. डॉ. अमोल महापुरे यांनी मातंग समाजाच्या एकत्रित शक्तीचा आणि संघटनबांधणीचा महत्त्व पटवून दिला. “समाजाच्या विकासासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन काम केले पाहिजे. मतांचे विभाजन न होता, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खोराटे साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या विचारांना सर्वांनी अनुमोदन दिले आणि समाजातील इतर गटांशी संवाद साधत एकत्रितपणे पुढे जाण्याचा संदेश दिला.
या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करत आगामी काळात विकासात्मक धोरणे कशी राबविता येतील यावर विचारमंथन केले. मेळाव्याच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने निर्णय घेत, एकत्रित राहून समाजहितासाठी पुढील पावले उचलण्याचे ठरविले.
चंदगड विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा खूपच महत्त्वाचा ठरला आहे. मातंग समाजाने एकत्र येऊन घेतलेला निर्णय चंदगड विधानसभेच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकतो. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजाने एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केला आणि भविष्यात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचे अनेक नेते व कार्यकर्ते एकत्र आले आणि समाजहिताचे विविध मुद्दे मांडले. या प्रसंगी अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. श्री अमोल महापुरे अण्णा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश चव्हाण, श्री. संतोष मळवीकर, माजी सभापती श्री. जगन्नाथ हुलजी, बहुजन संघटक श्री. पि.डी. सरवदे, अण्णा ब्रिगेडचे चंदगड तालुका अध्यक्ष श्री. बबन माने, आजरा तालुका अध्यक्ष श्री. शरद लोखंडे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष श्री. विजय दावणे, चंदगड रंगकर्मी अध्यक्ष श्री. शाहीर मधुकर कांबळे, सरपंच श्री. एकनाथ पाटील, श्री. अशोक माने, श्री. अप्पु मांग यांसारख्या समाजातील विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.
मुख्यसंपादक