Homeघडामोडीआवंडी ते धनगरवाडा दरम्यानच्या रस्त्याची रुंदी वाढवा -बहुजन मुक्ती पार्टीचे सार्वजनिक बांधकाम...

आवंडी ते धनगरवाडा दरम्यानच्या रस्त्याची रुंदी वाढवा -बहुजन मुक्ती पार्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

आजरा (हसन तकीलदार):-विटे येथील चित्री धरणापासून ते धनगरवाडा क्र.1दरम्यान बनवलेल्या रस्त्याची रुंदी निर्धारित निकषापेक्षा कमी असल्याने त्याचप्रमाणे चित्रीप्रकल्पाकडे पर्यटकांची रहदारी असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. साधी दोन वाहनेसुद्धा जाऊ शकत नाहीत त्यामुळे कित्येकदा अपघात झालेले असल्याने सदर रस्त्याची रुंदी निर्धारित निकषाप्रमाणे वाढवून मिळावी याबाबतचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने शाखा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, विटे येथील चित्री धरणापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत गेल्या तीन वर्षांपूर्वी बनवलेल्या रस्त्याची रुंदी केवळ 9 फूट आहे. वास्तवीक पाहता सदर रस्ता हा 11 फूट रुंदीचा असावा आमचा समज आहे कारण 9 फुटाचा रस्ता हा अतिशय अरुंद आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून एकावेळी कोणतीही दोन वाहने जाऊ शकत नाहीत. इतकेच नाही तर वळणाच्या ठिकाणी एका वेळी एक चार चाकी गाडी व दुसरी मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नाही. शिवाय चित्री प्रकल्प हे एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होत आहे त्यामुळे पर्यटकांची वाहने वारंवार येत असतात. यावेळी देखील दुचाकीस्वारांना गाडी चालवण्यास त्रास होत आहे. अनेकदा दुचाकीस्वारांचे या रस्त्यावर अपघात झालेले आहेत. याची दखल घेऊन व आवश्यकता लक्षात घेऊन सदर रस्त्याची रुंदी आपल्या निकषानुसार करून घ्यावी जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही अथवा अपघात होणार नाही त्याचप्रमाणे सदर रस्त्याचे अद्याप पाच वर्षे पूर्ण न झाल्याने वॉरंटीमध्ये आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला रस्ता करून घेण्यास कोणतीच अडचण येणार नसल्यामुळे याकडे लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता रुंदी करावी असे निवेदन दिले आहे.

निवेदनावर डॉ. उल्हास त्रिरत्ने (महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ), राहुल मोरे, अमित सुळेकर, तुकाराम कांबळे, शरद कुंभार आदींच्या सह्या आहेत.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular