आजरा (हसन तकीलदार :-मोरेवाडी ता. आजरा येथील पाझर तलावात गंगाराम आडुळकर या शेतकऱ्याची अंदाजे तीन एकर पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून दोन वर्षे झाली तरी अजूनही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. मागील दोन तीन वर्षापासून ते जलसंधारण कार्यालयाच्या पायऱ्या झीझवल्या तरीसुद्धा त्यांना आजपर्यँत न्याय मिळालेला नाही. म्हणून शेवटी त्यांनी आपल्या परिवारासहित आज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. अखेरीस दि. 22/05/2025रोजी सकाळी 11:00वा. प्रत्यक्ष पाझर तलाव मोरेवाडी येथे योजनेच्या कार्यस्थळावर मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी व जलसंधारण विभागाचे अधिकारी यांचेसमवेत वहिवाटीची पाहणी व पंचनामा करून बाधित क्षेत्राच्या वहिवाटी बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे लेखी पत्र जलसंधारण विभागामार्फत दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात येत आहे असे गंगाराम आडुळकर यांनी सांगितले.
मोरेवाडी ता. आजरा येथील गट क्र. 80 मधील 5 एकर जमिनीपैकी अंदाजे 3 एकरच्यावर बागायत जमीन ही बाधित झाली असून त्याप्रमाणे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अशी आडुळकर यांची मागणी आहे. यावेळी गंगाराम आडुळकर म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी हा पाझर तलाव तयार करण्यात आला. पहिल्यांदा मी ही जमीन देण्यास नकार दिला होता परंतु गावाच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि गावाचं भलं होऊ दे म्हणून काहींनी मध्यस्ती करून माझी संमती घेतली. मोबदला द्यायच्या आधीच काम सुरु केलं. तेथील झाडें तोडली, ऊसाचे क्षेत्र व विहीर असलेली जमीन गेली. दहा बारा जणांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह त्या शेतीवरच होत होते. जमीन गेल्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न पडला आहे. आता तेथे जॅकवेल ही बांधले आहे तीन वर्षे झाली तरी अजून मला नुकसान भरपाई व मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मला परिवारासह उपोषणाला बसावे लागत आहे. तीन वर्षे फेऱ्या मारतोय पण कोणी दखल घेत नाहीत अशी कैफियत त्यांनी यावेळी मांडली.
Like Comment and Share
मात्र काही तासानंतर उपविभागीय जलसंधारण अधिकारी कामेटीकर यांनी वहिवाटीची दि. 22/05/2025 रोजी प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करून बाधित क्षेत्रातील वहिवाटीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल त्याचप्रमाणे सह खातेदार यांचेसह 7/12 व 8अ इ. आवश्यक कागदपत्रे घेऊन कार्यस्थळावर उपस्थित रहावे असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
गंगाराम आडुळकर, बाळू आडुळकर, सविता आडुळकर, वंदना आडुळकर, भैरू आडुळकर, बबन चौगले (पेरणोली ), कॉ. संपत देसाई आदिजण उपोषण स्थळी उपस्थित होते.
अश्याच बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक च्या आधारे आम्हाला कॉल करावा…
यूट्यूब चॅनेल लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=zZp9YPoR3HWvLeFDलेख
व्हॉट्सअँपचॅनल लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=zZp9YPoR3HWvLeFDले
Facebook पेज लिंक करण्यासाठी
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

मुख्यसंपादक