Homeघडामोडीगेली चार पाच महिने पायाभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब...

गेली चार पाच महिने पायाभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजिरवाणी बाब –कॉ. संग्राम सावंत

आजरा (हसन तकीलदार ):-मागील चार पाच महिन्यापासून मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा नगर पंचायत हद्दीतील भारत नगर वासीय आपल्या पायाभूत व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नगरपंचायत, बांधकाम विभाग आणि वीज मंडळ यांच्याकडे निवेदने देत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या या सुविधांच्या मागणी निवेदनाना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्यामुळे संतप्त भारत नगर वासियांनी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून नगर पंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीच्या दारात ठिय्या मांडणार असा पवित्रा भारत नगर वासियांनी घेतला आहे.
आजरा नगर पंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या भारत नगरला मागील 27वर्षापासून पायाभूत सुविधा नाहीत. काल परवा झालेल्या कॉलन्या मध्ये डबल विकास होत असताना गेली 27वर्षापासून भारत नगरला रस्ते, गटारी, पथदिवे यासारख्या मूलभूत आणि पायाभूत सुविधासाठी आंदोलने करावी लागत आहेत. प्रशासन प्रत्येक वेळेला तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असून त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवत आहे. यासाठी संतप्त भारतनगरवासियांनी मोर्चा आणि ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भारत नगरमध्ये रस्ते करावीत, गटारीच्या सुविधा करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी, खुल्या जागेमध्ये लहान मुलासाठी अंगणवाडी आणि बगीचा करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चामध्ये महिला व बालकांचा समावेश लक्षणीय होता. लहान मुले हातात घोषणा आणि मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात ही मुले, महिला सायंकाळ पर्यंत ठिय्या मारून बसली होती तेव्हा सायंकाळच्या सुमारास नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी मुलांना घरी पाठवण्याची विनंती केली. त्यावेळी मुलांनी धडक उत्तर दिले की, आज आम्ही अर्धा दिवस उन्हात बसल्यावर आपणाला आमची दया आली परंतु मागील कित्येक वर्षापासून आम्ही गुडघाभर चिखलातून शाळेला जातोय त्याची तुम्हाला का काळजी नाही? असे अनेकविध प्रश्न करीत प्रशासनाचा पंचनामा केला.


मागील मिटिंगचा अहवाल आणि कामाबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही असा पवित्रा मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष कॉ. संग्राम सावंत यांनी घेतला. त्यामुळे अजूनही ठिय्या आंदोलन सुरु आहे.
यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे जिल्हासंघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सलाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर, खुद्बुद्दीन तगारे, तौफिक माणगावकर, गुलाब शिकलगार, यासिन सैय्यद, शगुफ्ता शेख, चांगुणा सुतार, नाजूकबी मुल्ला, मुदस्सर इंचनाळकर, पापा लतीफ, रहीम लतीफ, असिफ काकतिकर, मुफिद काकतिकर, रहुफ नसरदी, रशीद लाडजी, शौकत पठाण, म्हमदू नसरदी, सलीम ढालाईत, संगीता सुतार, रेश्मा काकतिकर, शबाना काकतिकर, रुकैय्या तगारे, सालिया सैय्यद, मुमताज शेख, सानिया माणगावकर, जरीना नसरदी, हिना नाईक, फरजाना नसरदी आदिसह भारत नगरमधील सर्व महिला मुले उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular