भादवण ( अमित गुरव ) -: भादवण गावात संयुक्त शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ०६ मार्च २०२६ रोजी विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्ताने गावातील शिवप्रेमींना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
आयोजकांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
सकाळी ८.०० वा. – किल्ले सामानगडहून शिवज्योतीचे आगमन
सायं. ५.०० वा. – हरिपाठ (भजनी मंडळ भादवण)
सायं. ५.३० वा. – पालखीपूजन व पालखीगीत
सायं. ६.०० वा. – पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक सोहळा
रात्री ८.०० वा. – रुचकर मठ्ठा
रात्री ८.१५ वा. – शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक व गडहिंग्लज येथील कलाकारांचा कार्यक्रम.

विशेष आकर्षण – शिवकालीन युद्धकला.
शिवजन्मोत्सवानिमित्त यावर्षी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक हे मुख्य आकर्षण ठरले. गडहिंग्लज येथील कलाकारांनी सादर केलेल्या या थरारक युद्धकलेने उपस्थित शिवप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, तरुणाई आणि शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
गोकुळ निवडणुकीच्या पाश्वभूमीवर link marathi लवकरच एक मालिका घेऊन येतं आहोत. तेव्हा आजच युट्युब चॅनेल Subcribe करा
https://youtube.com/@linkmarathi-news?si=SDd_A-sy0FaZcFf-

मुख्यसंपादक



