Homeघडामोडीपत्रकारांनाच मिळत नाही सुरक्षा ; कोल्हापूर जिल्ह्यात जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा...

पत्रकारांनाच मिळत नाही सुरक्षा ; कोल्हापूर जिल्ह्यात जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) -: आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड येथील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना निवेदन देत पत्रकारांच्या सुरक्षेबाबत तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पत्रकार विजय कांबळे यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ऋषिकेश कुर्डे या व्यक्तीवर करण्यात आला आहे. ही धमकी चंदगड येथील एका ग्रामपंचायत बातमीनंतर दिली गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कांबळे यांनी यासंदर्भात चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, तर केवळ अदखलपात्र तक्रार म्हणून नोंद घेण्यात आली आहे. यामुळे धमक्यादाराचा अधिकचा हिंसकपणा वाढला असून, पुन्हा धमकीचे मेसेजेस आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पत्रकारांवर होणाऱ्या अशा वाढत्या दडपशाही आणि धमक्यांमुळे संपादकीय स्वातंत्र्य धोक्यात येत असून, संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी या निवेदनातून करण्यात आली.

जर प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संघटनेने दिला आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दीपक मांगले, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष नितीन मोरे, आजरा तालुका अध्यक्ष संभाजी जाधव, गड उपाध्यक्ष अभिजीत मांगले, आजरा उपाध्यक्ष अमित गुरव, तसेच पत्रकार धनंजय शेटगे, अमित कांबळे, राजेंद्र यादव, निकिता पोवार, अशोक मोहिते आदींच्या स्वाक्षऱ्या असून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular