Homeघडामोडीआजरा तालुक्यात धनगरवाड्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे शालेय किटचे वितरण

आजरा तालुक्यात धनगरवाड्यांवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे शालेय किटचे वितरण

आजरा (अमित गुरव ) :
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत राज्यातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या “शालेय वस्तू किट वितरण” उपक्रमाचा आजरा तालुक्यातही सुंदर उपक्रम म्हणून अविष्कार झाला. तालुक्यातील विविध धनगरवाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले.

यामध्ये आवंडी येथील धनगरवाडा क्र. 1 आणि धनगरवाडा क्र. 3 येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना बॅग, वह्या, पेन्सिल, पट्टी, रंगसामान आदींचा समावेश असलेली शालेय किट देण्यात आली.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवून त्यांना शिक्षणात प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.


शालेय किट वाटप कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते :

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्रतिनिधी जितेंद्र भोसले

शिवसेना आजरा शहर प्रमुख विजय थोरवत

सरपंच बयाजी मिसाळ, बयाजी येडगे

आत्मा कमिटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई

संजय शेणवी, साळगाव सरपंच धनंजय पाटील

संतोष भाटले, दयानंद निऊंगरे, मंदार बिरजे

शिक्षक आशा पाटील, रघुनाथ जाधव, दूंडाप्पा नाईक

शालेय समिती अध्यक्ष बिरू गावडे, उपाध्यक्ष चिंतामनी येडगे

अंगणवाडी सेविका रंजना मिसाळ, मदतनीस सुजाता येडगे

विद्यार्थी व पालक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शैक्षणिक प्रोत्साहनाचा स्तुत्य उपक्रम

या किट वितरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च कमी होणार असून, शिक्षणावरील त्यांचा उत्साह अधिक वाढेल.
दुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवला जात आहे.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular