Homeघडामोडीचंदनकूड सह हलकर्णी परिसरातील खडिक्रशरच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मुक्ती संघर्ष समितीचा पाठिंबा

चंदनकूड सह हलकर्णी परिसरातील खडिक्रशरच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मुक्ती संघर्ष समितीचा पाठिंबा


महसूल खात्याचा चुकीचा कारभार जनतेसमोर आणणार –कॉ. संग्राम सावंत
आजरा (हसन तकीलदार ):-सनदशीरमार्गाने मागील दोन महिन्यापासून
चंदन‌कुडसह हलकर्णी परिसरात असणाऱ्या खडीक्रशरमुळे हलकर्णी येथील बाधित शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल करत जनावरांसह खडी क्रशर बंद करा!! हलकर्णीसह पर्यावरण वाचवा!! या मुद्दांबाबत सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला 17 एप्रिल,2025 पासून राजू पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांच्या व इतर शेतकरी आंदोलक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुक्ती संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. यासाठी हलकर्णी येथे आंदोलनाच्या स्थळी भेट देण्यासाठी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, दिगंबर विटेकरी व इतर कार्यकर्ते यांनी भेट दिली त्यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली,”खडी क्रशर परिसरातील शेती नापीक झाली आहे. घरांना भेगा पडल्या आहेत. शेतातील धूळमिश्रित चारा खाऊन जनावरे आजारी पडत आहेत.नागरिकांना धुळीमुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी तालुकास्तरीय जबाबदार अधिकाऱ्यांनी करून सुद्धा हे प्रशासन आमच्या जीवावर का उठले आहेत?आमच्या जीवापेक्षा शासनाला क्रशरचा महसूलच अधिक महत्त्वाचा असेल तर आमची गुरेढोरे शासनाच्या स्वाधीन करावित का?” असे आंदोलनकारी शेतकरी यांचे म्हणणे आहे.कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाली. कालपासून ते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी घरी न जाता रुग्णालयातूनच गेली तीन दिवस आंदोलक व जनावरे उन्हात न्याय मागण्यांसाठी लढा देत आहेत. मात्र या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची दया अद्याप शासनाला आलेली नाही. शासनाला जाग येणार नाही.यासाठी पुढे काय करायचे? काय काय झाले आहे? काय काय केले आहे? याबाबतीतील सर्व माहिती समजून घेऊन त्याबाबतीची सर्व कागदपत्रे तपासून तसेच हलकर्णी येथील सात खडी क्रशरमुळे नागरी वस्ती तसेच शेतजमीन चारा, गुरे-ढोरे यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याविरुद्ध बाधित शेतकऱ्यांनी गेली दोन महिने सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाची शासनाकडून योग्य दखल घेण्यात आली नाही व संबंधित क्रशर अद्याप चालूच आहेत. त्यामुळे हलकर्णी येथे खडीक्रशर विरोधातील आंदोलनात शेतकरी जनावरांसह सहभागी झाले आहेत. हे सर्व समजून घेऊन या आंदोलनाला मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा जाहीर करून. याबाबतीत मुक्ती संघर्ष समिती पुढील लढासाठी आंदोलकांच्याबरोबर असणार आहे. यासाठी मुक्ती संघर्ष समिती दररोज राजू पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते )व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात दररोज आहे. आणि यासाठी पुढची लढाई सुद्धा मुक्ती संघर्ष समिती छेडणार आहे. असे आश्वासन आंदोलकांना यावेळी संग्राम सावंत यांनी दिले.यावेळी कॉ. संग्राम सावंत यांनी कोणकोणत्या बाबीवर आपला लढा सुरु राहिल ते मुद्देही नमूद केलेले आहेत.

1)महसूलच खात्याचा चुकीचा कारभार जनतेसमोर आणणार…
2) क्रेशर मालकांनी घेतलेल्या वेगवेगळ्या परवानग्या व ना हरकत दाखल्यांची पुन्हा तपासणी करण्यासाठी आवाज उठवणार….
3) उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज चंदगड विभाग गडहिंग्लज यांच्यासमोर स्थळ पाणी करायला गेल्यावर बेकायदेशीररित्या खडी क्रेशर घेऊन जाणाऱ्या वाहनांची चाललेली वाहतूक याचा झालेल्या पंचनामाचे पुढे काय झाले अशा अनेक बेकायदेशीर गोष्टी हलकर्णी येथे घडत आहेत. याचाही सवाल जिल्हाधिकाऱ्यांना व विभागीय आयुक्तांना विचारणार….
4) ग्रामसभेचा ठराव मोडून बेकायदेशीररित्या मासिक सभा ठराव करणाऱ्या सर्व संबंधित तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सरपंच आणि सदस्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार …….
5)क्रशर बेकायदेशीर नाही. असं म्हणणाऱ्या क्रेशर मालकांना मुक्ती संघर्ष समितीचा जाहीर सवाल आहे ते क्रशर बेकायदेशीरच आहे. हे आता आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करणार…
6) परवानग्या देणाऱ्या सर्व विभागांची आता कसून चौकशी झाली पाहिजे. यासाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे मागणी करणार….
7) हायकोर्टाने निकाल हा क्रेशर बेकायदेशीर आहे किंवा नाही. असा निकाल दिलेला नाही. तर तहसीलदारांच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टाने निर्णय व निकाल दिलेला आहे…
8) अधिकार नसताना तहसीलदारांनी क्रशर बंदचा आदेश दिलाच का याची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कडे व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे मागणी करणार….
9)वेगवेगळ्या विभागांनी दिलेल्या परवानग्या व नाहरकत दाखले यांची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार…..
10) वर्तमानपत्रात बातमी देऊन आम्ही कोणाकोणाला पैसे दिले आहेत असे जाहीर केलेल्या व पैसे देऊन चुकीच्या पद्धतीने क्रशरचा कारभार करणाऱ्या, क्रशरमालकांची चौकशी करा. अशी अँटी करप्शन विभागाकडे मागणी करणार….।
11)मागील काही वर्षांमध्ये याबाबतची आंदोलने का झाली नाहीत.? असा सवाल करणाऱ्या क्रेशर मालकांना आमचे आव्हान आहे की आंदोलन का केले नाही यापेक्षा आपण चुकीचा कारभार इतक्या वर्षे का केला? याचा हिशोब मुक्ती संघर्ष समिती विचारणार आणि घेणार….
12)क्रशर मालकांसोबत कोण कोण होते, याचाही खुलासा यापुढे करणार, असे दैनिकांमध्ये प्रसिद्ध पत्रक देणाऱ्या क्रशर मालकांना मुक्ती संघर्ष समितीचे आव्हान अशी नावे ताबडतोब जाहीर करा. कोण कोण तुमच्याबरोबर होते यापेक्षा आपण क्रशर न्यायिक बाजूने व पर्यावरणाला हानी न होता चालवत आहात का? हे महत्त्वाचे आहे.
13) क्रशर मालकांना परवानग्या कशा मिळाल्या याचा तपास फेर तपास करण्यासाठी मागणी करणार तसेच क्रशरमालकांच्या मालकी हक्क कसा बदलत गेला आणि याबाबतीतील सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी मागणी करणार…..
अशा सर्व मुद्यासाठी आपण या लढ्यात शेतकऱ्यांना पाठिंबा देत उतरणार असे कॉ. संग्राम सावंत यांनी सांगितले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular