Homeकला-क्रीडाODI World cup 2023 : भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs PAK...

ODI World cup 2023 : भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs PAK वर्ल्ड कपचा महामुकाबला

ODI World cup 2023 : भारतातील ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार IND vs PAK वर्ल्ड कपचा महामुकाबला

मुंबई : क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये खरी रंगत येते, ते भारत-पाकिस्तान सामन्याने. 1992 पासून वनडे असो किंवा T 20 दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सामने झाले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर त्या वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी क्रिकेटरसिक वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने प्रतिक्षा करत असतात.

वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकदाच पाकिस्तानच्या टीमला भारताला हरवणं शक्य झालय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकदाच पाकिस्तानी टीमने भारतावर विजय मिळवला होता.
नेहमीच टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा सरस

हा एक अपवाद सोडल्यास, वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध अजिंक्य राहिली आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकदाही पाकिस्तानी टीमला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या स्टेजवर नेहमीच पाकिस्तान विरुद्ध सरस खेळ दाखवलाय.

वर्ल्ड कपच वेळापत्रक BCCI कधी जाहीर करणार?

यावर्षी वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटला सुरुवात होईल. इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर BCCI वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर करणार आहे. सर्वच क्रिकेट रसिकांना उत्सुक्ता आहे ती, भारत-पाकिस्तान सामन्याची. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान लढत यंदा कुठल्या शहरात रंगणार? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.


भारत-पाक सामन्यासाठी त्याच स्टेडियमची निवड का?

यंदा ODI वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. 1 लाख प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता या स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे BCCI ने भारत-पाकिस्तान लढतीसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमची निवड केली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय.

वर्ल्ड कपमध्ये एकूण 48 सामने होतील. बाद फेरीचे तीन राऊंड होतील. यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवस चालणार आहे. सात ठिकाणी साखळी फेरीचे सामने होतील. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला, तर तिथे भारताचे दोन सामने होतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular