आजरा (हसन तकीलदार ):-24एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून आजरा पंचायत समितीतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आपले योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी देवर्डेचे सरपंच जी. एम. पाटील यांचा जंगल संवर्धन वणवा निर्मूलन मोहीम, सोहळे बाची सरपंच सौ. भारती डेळेकर यांचा विविध विधायक व विकास कामाबाबत, पेरणोलीच्या सरपंच सौ. प्रियांका जाधव यांचा सरपंच व सदस्य यांच्या मानधनातून विधवा महिलांचा घरफाळा भरला, संवेदना फाउंडेशन आजरा आरोग्य, वृक्ष संवर्धन, महिला सक्षमीकरण, आपत्ती व्यवस्थापन, शालेय सुधारणा इ., खानापूर सरपंच सौ कल्पना डोंगरे व ग्रामपंचायत अधिकारी विशाल दूंडगेकर स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुक्यात प्रथम, संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक,वाटंगी सरपंच मधुकर जाधव व ग्रामपंचायत अधिकारी रणजित पाटील, सुळे /लाकूडवाडी ग्रामपंचायत अधिकारी मुरलीधर कुंभार, मेंढोली ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव यांचा स्मार्ट ग्रामपंचायत व माझी वसुंधरा, पर्यावरण संवर्धन, वक्षारोपण संदर्भात भरीव योगदान बाबत, विद्यामंदिर हाजगोळी मुख्याध्यापक कृष्णा खाडे यांचा हात्तीवडे येथील उद्यान विकास व वृक्षारोपण, मलिग्रे सरपंच सौ. शारदा गुरव स्मार्ट ग्राम पर्यावरण पूरक गणेश विसर्जन, एक गाव एक गणपती या सर्वांचा आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान देऊन कार्य केल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सहाय्य्क गटविकास अधिकारी शेटे, विस्तार अधिकारी (पंचायत )कुंभार, विस्तार अधिकारी (शेती )मिसाळ, विस्तार अधिकारी (सांख्यिकी )गवळी तसेच पंचायत समिती मधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यसंपादक