कोल्हापूर -: (अमित गुरव ) कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड असतो. हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोच. त्यामुळे इथले डायलॉग , बॅनर किंवा इतर काही बाबी नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू होतात.
सध्या राजकीय नाट्य इतक्या जलद गतीने पुढे सरकत आहे की मी नेमके मतदान कोणत्या पक्षाला व का दिले हे लोकांना समजायच्या आतच अन्य घटनांनी महाराष्ट्र चर्चेत येतो.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या सोबत पवार एके पवार म्हणणारे कागलचे आमदार हसन मुश्रीफ गेले . पण माझ्यावर ED भाजपने लावली असा आरोप करणारे मुश्रीफ त्यांच्यातील एक (युती ने) झाले.
आज बऱ्याच लोकांच्या सोशल मीडिया वर निवडणूक याविषयी अश्याच नकारात्मक भावना दिसत होत्या .
कागल मतदासंघांत काही ठिकाणी आता तरी आमच्या साहेबांच्या पाठीमागचा ED चा ससेमिरा जाणार का अश्या प्रतिक्रिया होत्या. आज त्या गोरगरीब आया बहिणी आमचा साहेब निर्दोष आहे , भाजप चोर आहे असा टाहो फोडीत प्रसंगी पोलिसांच्या काठ्या झेलल्या त्यांना चांगली झोप लागेल. ज्या भाजपने मुश्रीफ यांना अडचणीत आणण्यासाठी कोणाची तरी मदत घेतली आता त्यांना आमचे साहेब वरिष्ठ मानतात की ते आमच्या साहेबांच्या मागे पडतात. असे नानाविध खोचक टोमणे आणि टीका काही अराजकीय लोकांच्या कडून एकवण्यात येत होत्या .
क्रमशः
मुख्यसंपादक