Homeघडामोडीचंदगड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय धुमशान | Political chaos in Chandgad assembly...

चंदगड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राजकीय धुमशान | Political chaos in Chandgad assembly election arena

अमित गुरव – : आजरा – गडहिंग्लज – चंदगड मतदारसंघात राजकीय धुमशान होणार आहे ह्यांचे संकेत मिळत आहेत. इच्छुक उमेदवार त्यासाठी आता पासून तर काही जण पूर्वी पासूनच मशागत करत असल्याचे दिसून येते.

                     विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असली तरी त्यांचा बाबत मतदारांच्या मनामध्ये  अजित पवार गटात सामील झाल्याची तसेच अल्पजनसंपर्क आणि  इतर काही गटातटाचे राजकारण यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तसेच  शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केल्यास त्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.


                      शिवाजी पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपली उमेदवारी जाहीर केली . त्यांचा जनसंपर्क चांगला असून मागील वेळी दुसऱ्या स्थानावर ते होते. चंदगड तालुक्यातून त्यांना चांगले मताध्यक्या होते पण भाजपचेच अशोक चराटी आणि रमेश रेडेकर हे  उमेदवार रिंगणात असल्याने थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 
                  तर मागच्या काही दिवसांपूर्वी मानसिंग खोराटे यांनी ही घोषणा करून पक्षाच्या चिन्हासह किंवा अपक्ष पण उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले. त्यात त्यांना दोन राष्ट्रीय पक्षांनी उमेदवारी ची ऑफर दिली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बंद पडलेला दौलत कारखाना खूप हिमत्तीने आणि हुशारीने चालू करण्यात त्यांना  यश आले  .काही दिवसापूर्वी कामगाराची समस्या होती पण तीही त्यांनी वेतनवाढ करत त्यांची नाराजी दूर केली . त्यामुळे त्यांच्या बद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे. 

विनायक उर्फ अपी पाटील ह्याचा कोलिंद्रे जिल्हापरिषद मद्ये वाढता जनसंपर्क आहे . मागील वेळी ते तीन नंबरला होते त्यामुळे निसटता पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्याची कसर ते आता भरून काढतील ?
याबरोबरच मागील विधानसभा निवडणुकीत अनिरुद्ध रेडेकर , संग्रामसिंह कुप्पेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती तर काही मंडळींनी उमेदवारी काही कारणास्तव मागे घेतली . पण पूर्वीची अपक्ष उमेदवार यादी आता थांबते की अजून दुसरीच यादी तयार होते याकडे विशेष लक्ष सध्यातरी आजरा , गडहिंग्लज तालुक्यातील जनता पाहताना फारशी दिसत नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular