शाहीर संदीप दाभीलकर यांनी सर्वांना केले मंत्रमुग्ध
आजरा (हसन तकीलदार ):-ज्ञानदीप सिद्धार्थ सामाजिक व शैक्षणिक संस्था आजरा संचलित चॅम्पियन क्लासेस आजरा तर्फे हस्ताक्षर व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाट्न भगवा रक्षक संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ सावंत यांच्या हस्ते झाले तर शाहीर संदीप दाभीलकर यांनी आपल्या आवाजाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले सुंदर विचार मांडून विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रमनी यांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा रेखा कांबळे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल प्रधान यांनी केले तर आपल्या संस्थेचे कार्य व महत्व पटवून देण्याचे कार्य उपाध्यक्षा रेखाताई कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कांबळे यांनी केले.

या स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या पहिले तीन व उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धातील विजेते पुढील प्रमाणे आहेत.
हस्ताक्षर स्पर्धा लहान गट (मराठी माध्यम)
प्रथम क्रमांक -शांभवी संतोष पंडित (स्वामी. प्राथ.)
द्वितीय क्रमांक -स्वरा मोहन मोरे (व्यंकटराव प्राथ.)
तृतीय क्रमांक -प्रिया भारत बागुल (रवळनाथ प्राथ.)
उत्तेजनार्थ -संचिता संतोष राणे (व्यंकटराव प्राथ.)
हर्षवर्धन जनार्दन जांभळे (रवळनाथ प्राथ )
हस्ताक्षर स्पर्धा (इंग्रजी माध्यम )
प्रथम क्रमांक -शौर्य नितीन माने (रोझरी )
द्वितीय क्रमांक -आराध्या अजित डांगे (आण्णा -भाऊ )
तृतीय क्रमांक -वेदा दत्तात्रय लोंढे (आण्णा -भाऊ )
उत्तेजनार्थ -वेदश्री देसाई (रोझरी )
इनाया इम्रान अत्तरवाले (रोझरी )

निबंध स्पर्धा (मोठा गट)
प्रथम क्रमांक पुर्वा प्रताप मोरे (व्यंकटराव हाय.)व तन्मयी सुखदेव गाडे (आजरा हाय.)
द्वितीय क्रमांक -समीक्षा सुनील मटकर (पंडित दीनदयाळ )
तृतीय क्रमांक -श्रेया महादेव भादवणकर (आण्णा -भाऊ )
उत्तेजनार्थ -ईश्वरी चंद्रकांत ठाकूर (आजरा हाय.)
तृप्ती कृष्णा खरूडे (व्यंकराव हाय. )
यावेळी महिला व बालविकास अधिकारी शशिकांत पाटील विक्रमसिंह देसाई, सचिन इंदलकर, इम्रान अत्तरवाले आदिजण उपस्थित होते. आभार डी. एस. बी. डेळेकर यांनी मानले

मुख्यसंपादक