आजरा (हसन तकीलदार):-आजरा नगरपंचयतीच्या निवडणूक कालावधीची मुदत संपून गेली आहे. निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अंदाजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025मध्ये नगरपंचातीच्या निवडणूकीचे बिगुल वजणार हे नक्की झाले आहे. यासाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरु होणार आहे. एकूण 17प्रभागांची रचना असून 11जून ते 16जून 2025या कालावधीत मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत प्रगणक गटाची मांडणी करणे, पुढील कार्यवाही म्हणजे मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत प्रारूप प्रभाग रचना करणे. यामध्ये अनुक्रमे 17जून ते 18जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, 19ते 23जून स्थळ पाहणी करणे, 24ते 26जून गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, 27ते 30जून नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जाऊन तपासणे आणि 1ते 3जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसूद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे.
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत पाठविणे (4जुलै ते 8जुलै ), त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, 15जुलै ते 21जुलै प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत हरकती अगर सूचना मागविणे, 22जुलै ते 31जुलै जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त हरकती अथवा सूचनावर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या अखत्यारीत सुनावणी घेणे. सुनावणीनंतर शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेस पाठविणे. मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत 1ऑगस्ट ते 7ऑगस्ट 2025 पर्यंत राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्त अथवा मुख्याधिकारी यांना कळविणे. आणि 22ऑगस्ट ते 1सप्टेंबर 2025पर्यंत मुख्याधिकारी यांच्या अखत्यारीत राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक