अमित गुरव -: महाराष्ट्रातील पतसंस्थेमध्ये गुणात्मक दृष्ट्या प्रथम क्रमांकावर आणि सहकार क्षेत्रामध्ये गेली 42 वर्ष आदर्श काम करणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई या संस्थेने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षी एकूण ५३६ कोटी संमिश्र व्यवसाय केला असे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री गोरख चव्हाण यांनी नमूद केले.
31 मार्च 2025 अखेर संस्थेच्या ठेवी 2906 कोटी , येणे कर्ज 2217 कोटी असा एकूण 5125 कोटींचा समिश्र व्यवसायाचा टप्पा संस्थेने पार केला . सण 2024 – 25 या आर्थिक वर्षात संस्थेला 60 कोटींचा ढोबळ नफा मिळाला. कर्ज वसुलीच्या दृष्टीने अतिशय नियोजनबद्ध काम करून थकबाकी कमी करण्यात यश संपादन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेच्या 102 शाखा आहेत त्यांनी सहकाराला अध्यात्माची जोड दिली हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
संस्थेला नानाविध 19 पुरस्कार प्राप्त आहेत. वेळोवेळी कर्मचारी आणि प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात संस्था अग्रेसर भूमिका बजावते असे समजते.
ठेवी , कर्ज , थकबाकी व एन पी ए या प्रत्येक स्तरातील कामगिरी उत्तम असल्याचे मत संस्थापक व उपाध्यक्ष श्री. चंद्रकात वंजारी यांनी व्यक्त केले.
ठेवीदार , ग्राहक , कर्मचारी , प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून हे यश संपादन झाले त्यांचे आभार श्री. चव्हाण यांनी मानले.

मुख्यसंपादक