भक्ती भाव आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री. महालक्ष्मी यात्रा संपन्न अमित गुरव -( भादवण) -: भादवण गावची श्री महालक्ष्मी यात्रा सालाबाद प्रमाणे यावर्षी ही भक्ती भावात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाली. भाविक आणि माहेरवसियांसाठी ह्या यात्रेची प्रवणीच असते नववधूना पै पाहुण्यांची ओळख आणि लेकीना बालमैत्रिणींचा सहवास हा सुखद अनुभव गाठी ठेवत हे अस्मरणीय श्रण डोळ्यात साठवता येतात .
चौकट -: भादवण चे ग्रामस्थ विमानाने यात्रेसाठी आले ही ह्या यात्रेची खासियत ठरली याचे आयोजन आर. बी. पाटील यांनी खूप छान पद्धतीने केले . त्यांची दखल तालुका पातळीपासून ते जिल्हास्तरीय पत्रकारांनी घेतली.

गावातील तरुण पिढीने आपल्या आपल्या मंडळ , संघटना , पक्षामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . सरपंच माधुरी गाडे, यात्रा कमिटी अध्यक्ष संजय पाटील, मानकरी आणि कमिटी पदाधिकारी तसेच सदस्य यांनी यात्रेचा उत्सव मोठ्या दणक्यात संपन्न करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

मुख्यसंपादक