Homeघडामोडीमौजे लिंगवाडी येथे एस. टी. सेवा सुरु करा अन्यथा धरणे आंदोलन करणार....

मौजे लिंगवाडी येथे एस. टी. सेवा सुरु करा अन्यथा धरणे आंदोलन करणार. बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा आगाराला निवेदन


आजरा (हसन तकीलदार):-
मौजे लिंगवाडी, तालुका आजरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस सुरू करण्यासाठी नागरिकांची मागणी होत आहे. परंतु अनेकदा मागणी करूनही एसटी प्रशासनाने तेथे एसटी सुविधा सुरू केलेली नाही. यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर एस टी सुविधा सुरु करावी अन्यथा एकदिसीवसीयद धरणे आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे की,सदर विषयासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपणास या अगोदरही निवेदन सादर केलेले आहे. त्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांनी सदर रस्ता सुस्थितीत असल्याचा दाखला घेऊन येण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, आजरा यांचा दाखला आपल्याजवळ सादर केला होता परंतु सदर रस्ता ग्रामीण रस्ते विकास संस्था या संस्थेकडे असल्याचा असल्याने त्या संस्थेचा दाखला आणण्यास आपण सांगितल्याने आम्ही कोल्हापूरहून सदर दाखला घेऊन आलेलो आहोत. तरी आता या दाखल्यानंतर लिंगवाडी येथील बसच्या फेऱ्या आपण नेहमीच सुरू कराव्यात.
या पत्रानंतर पुढील ७ दिवसात आपण एसटी सुरू न केल्यास दिनांक २५ जुलै २०२५ रोजी एस टी स्टँड आजराच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करणार आहोत. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी एसटी महामंडळ जबाबदार असेल याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर लिंगवाडी येथे एसटी सुरू करावी असे आवाहन या निवेदनातून करण्यात आले आहे.


यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, अमित सुळेकर, भिकाजी कांबळे, महादेव कांबळे, संतोष मासोळे, अवधूत सुतार,सुरेश दिवेकर, सुधाकर प्रभू, नितीन राऊत रवी देसाई आदिजण उपस्थित होते.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

🌐 वेबसाईट:
👉 www.linkmarathi.com

📺 यूट्यूब चॅनेल:
👉 https://youtube.com/@linkmarathi-news

📘 फेसबुक पेज:
👉 facebook.com/profile.php?id=100063705265578

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp:
👉 whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular