Homeघडामोडीआठवड्यात एस. टी. सेवा सुरु करा नाहीतर धरणे आंदोलन करणार - बहुजन...

आठवड्यात एस. टी. सेवा सुरु करा नाहीतर धरणे आंदोलन करणार – बहुजन मुक्ती पार्टी

चंदगड(हसन तकीलदार):-चंदगड तालुक्यातील होसूर भागातील गावाना गेल्या अनेक वर्षापासून एस. टी. सेवा सुरु करणेसाठी नागरिकांची मागणी होत आहे. परंतु अनेकदा मागणी करूनही चंदगड आगार गांधारीची भूमिका घेत डोळ्यावरची पट्टी काढायला तयार नाही. या अगोदरही बहुजन मुक्ती पार्टीने निवेदने दिली होती त्यावेळी 3 जुलै 2025 पर्यंत एस. टी. सेवा सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तरीसुद्धा आजअखेर चंदगड आगाराने एस. टी. सेवा सुरु न केल्याने आगार व्यवस्थापकांना आठवडयाचे अल्टीमेटम देत एक दिवशीय आंदोलन करणार असल्याचे निवेदन चंदगड आगार व्यवस्थापकांना बहुजन मुक्ती पार्टी चंदगडच्या वतीने देण्यात आले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, होसूर भागात एस. टी. सेवा नसल्यामुळे नागरिक, महिला, वृद्ध तसेच विद्यार्थी यांची गैरव्यवस्था होत आहे.चंदगड तालुक्याच्या ठिकाणी अनेक शासकीय कामासाठी वृद्धाना,तसेच इतरांना यावे लागते. परंतु एस. टी. सुविधा नसल्याने अनेकदा अडचणी येत आहेत. बहुजन मुक्ती पार्टी, चंदगडच्या वतीने या अगोदर निवेदने देण्यात आलेली आहेत त्यानंतर सदर रस्ता सुस्थितीत असल्याचा सर्व्हे करून बस सुविधा सुरु करू असे 3 जुलै 2025 रोजी परिपत्रक काढून आश्वासन देण्यात आले होते. परंतु महिना होत आला तरी चंदगड आगार व्यस्थापकांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरु केलेली नसलेने या आठवड्यात जर एस. टी.ची सोय करून सुविधा दिली गेली नाही तर दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी चंदगड तालुक्यात एक दिवशीय धरणे आंदोलन करणार असुन या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी एस. टी. महामंडळ जबाबदार असेल असे या निवेदनात म्हटले आहे..


निवेदनावर गजानन तरवाळ (अध्यक्ष)अमित सुळेकर (सचिव बहुजन मुक्ती पार्टी, चंदगड ), प्रफुल्ल संजय कांबळे (भारतीय विद्यार्थी मोर्चा, चंदगड )यांच्या सह्या आहेत.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular