Homeघडामोडीतालुक्यातील पंचायत समिती व जिल्हापरिषद गण वाचवण्यासाठी शिंदे यांची धडपड कौतुकास्पद

तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हापरिषद गण वाचवण्यासाठी शिंदे यांची धडपड कौतुकास्पद

आजरा(हसन तकीलदार) :-आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन गण कमी केल्याने सुनील शिंदे यांनी याबाबत हरकत दाखल केली आहे. त्याची सुनावणी व म्हणणे मांडण्यासाठी 5ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक आयुक्त कार्यालय पुणे येथे हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी कोणाकडे पुरावे तसेच अधिक माहिती असेल तर देण्यासाठी आवाहन केले आहे.

तालुक्याला तीन आमदार लाभलेत तरीसुद्धा तालुक्याला अनेक प्रश्नासाठी व अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी येत आहे. त्यामुळे तालुक्याला नशीबवान म्हणायचे की कमनशिबी हा प्रश्न पडतो. टोल पासून मतदार संघ वाचवण्यासाठी आज लढा द्यावा लागत आहे. हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्यासारखे वाटते. अगोदर तालुक्याचे तीन तुकडे केले आता पंचायत आणि जिल्हापरिषदेचे गण कमी करून पुन्हा एकदा अन्याय तालुक्यावर केला आहे. हे गण अबाधित ठेवण्याकरिता सर्वपक्षीय आजरेकर लढा देत आहेत. परंतु ज्या प्रमाणात हरकती व लढा पाहिजे होता तितका नसल्याचे मत सुनील शिंदे यांनी मांडले.

केवळ निवडणूकीसाठी रिंगणात उतरणाऱ्या उमेदवाराला लोकांनी स्थान देऊ नये असेही त्यांनी यावेळीस म्हटले. तालुक्यातील काहींनी हरकती घेतल्या आहेत तसेच काहीजण न्यायालयीन लढा देत आहेत या सर्वांना सहकार्य करण्याच्या आवाहनाबरोबरच निवडणूक आयुक्त कार्यालय पुणे येथे आपले म्हणणे मांडण्यासाठी ज्यांच्याकडे काही पुरावे अथवा इतर अधिकृत माहिती असेल तर आपल्याला प्रत्यक्ष भेटून अथवा वॉट्सअप द्वारे देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. शिंदे आणि इतरांनी ज्या हरकती घेऊन तालुक्याच्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular