अमित गुरव -: डॉ. नंदाताई कुप्पेकर या शांत संयमी नेत्या असून त्यामुळेच त्यांची आजही तितकीच क्रेझ मतदारसंघात कायम आहे.
त्या बाबासाहेब कुप्पेकर यांच्या सुकन्या हा त्यांचा प्लस पॉइंट नाकारता येत नाही. कारण त्यांच्या वडिलांनी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आजही त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आहेत.
डॉ. बाभूळकर उच्चशिक्षित तर आहेतच शिवाय त्यांच्याकडे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे धोरण आणि उद्दिष्ट साध्य करण्याची श्रमता आहे. तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर करतील अशी चंदगड तालुक्यातील जनतेला आशा आहे.
बाभुळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात विरोध झाला असला तरी कित्येकांची नाराजी दूर करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत असेच म्हणावे लागेल. त्यामुळे शरद पवार यांनी योग्य उमेदवार निवडला आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी वयस्क मंडळींनी मते व्यक्त केली.
तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे महागाव येथे प्रचार सभेला येणार असून त्यांना साथ देण्यासाठी आणि ऐकण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुख्यसंपादक