Homeघडामोडीदि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोशिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न……!!!!

दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोशिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न……!!!!

कोल्हापुर :- दि कोल्हापूर ग्रेन कॅन्व्हासिंग एजंट असोशिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली , माजी अध्यक्ष अरविंद जैन उपाध्यक्ष श्री निळकंठ सांगवडेकर सेक्रेटरी श्री शिरीष साबणे खजानीस श्री चेतन जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरी गवत मंडई येथील हॉटेल झोरबा मध्ये उत्साहात पार पडली.
सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरवातीस संस्थेचे सभासद , वारसदार व्यापारी, तसेच जिल्ह्यांसह राज्याच्या आणि देशाच्या विविध क्षेत्रातील मृत मान्यवरांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे नोटीस वाचन संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी धनंजय सोळके यांनी केले. विषय पत्रिकेवरीत विषयासह तयार करण्यात आलेली व्यापारी आचारसंहिता अशा अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेचे सभासद कमल दवे, शिवाजी यादव, वैभव सावर्डेकर, संदिप पाटील, तुकाराम पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन सभेला रंगत आणली. सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचे कामकाज केले जाईल कोणताही निर्णय सभासदांच्या मान्यते शिवाय घेतला जाणार नाही अशी ग्वाही अध्यक्ष यांनी दिली.



संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.सभेची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. आभार धनंजय सोळके यांनी मानले. सभेला संस्थेचे संचालक रतिलाल भंडारी शंकर स्वामी , हितेश त्रिवेदी , महेश सन्नकी , चव्हाण , प्रदीप मेळवंकी, शहाजी पाटील याच्यासह संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते. सभेस खास अतिथी म्हणून दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनच्या सर्व संचालकांना आमंत्रीत करण्यात आले होतं.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular