Homeघडामोडीताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील- अशोकअण्णा चराटी...

ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील- अशोकअण्णा चराटी यांनी व्यक्त केला विश्वास

आजरा (हसन तकीलदार) ताराराणी आघाडीला आबूताहेर तकिलदार यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध गटांचा पाठिंबा दिल्यामुळे ताराराणी आघाडीला आता अधिकच पाठबळ मिळाले आहे.


आजरा शहराच्या विकासासाठी नेहमीच काम केले आहे. यापुढेही आजरा शहराच्या विकासाचा ध्यास कायम राहणार आहे. माझ्यासह ताराराणी आघाडीच्या उमेदवारांची विकासासाठीची धडाडी साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आजरा शहरातील जनता माझ्या पाठीशी ठाम उभे असल्याने ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष व 17 नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास तररणी आघाडीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आबूताहेर तकीलदार, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, अश्कर लष्करे, सना चाँद, महंमदसाब तकीलदार यांच्यासह मुस्लिम समाजातील विविध गटांनी ताराराणी आघाडीला पाठिंबा जाहीर केला.


स्वागत विलास नाईक यांनी केले. अशोकअण्णा चराटी पुढे म्हणाले, जुन्या भाजपला सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका होती. मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी यात खोडा घातला. तालुक्यातील तीनही आमदार ताराराणी आघाडी सोबत आहेत. आत्तापर्यंत शहराचा विकास झाला आहे, आगामी काळात आणखीन विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. आत्तापर्यंत नऊ-दहा प्रभागांमध्ये प्रचार दौरा पूर्ण झालेला असून जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच प्रभागात ताराराणी आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने ताराराणी आघाडीचे नगराध्यक्ष बरोबरच सर्वच्या सर्व 17 नगरसेवक केवळ विजयी होणार नाहीत तर त्यांच्या मतांच्या जवळपास देखील विरोधी उमेदवारांना मतदान होणार नाही. गतसभागृहातील पाच वर्षात सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकत्र बसून निर्णय घेतले आहेत. मग मी हुकूमशहा असल्याचा साक्षात्कार आत्ताच कसा झाला? एखादा मोठा उद्योग शहरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल. युवकांच्या हाताला रोजगार मिळेल.आतापर्यंत सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. मात्र प्रशासकीय कारकिर्दीतील विकास कामांच्या बाबत जी आजची परिस्थिती आहे त्याला आम्हालाच जबाबदार धरले जाते हे चुकीचे आहे. प्रशासनाची चूक आमच्या माथी मारणे योग्य नाही.सगळ्यांना सोबत घेऊन ताराराणी पॅनेल केले आहे, पुढील काळात सगळ्यांना सोबत घेऊन आजरा शहराचा विकास साधला जाणार आहे. यावेळी आबूताहेर तकिलदार म्हणाले की, समाजासाठी काम करण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक होतो, सर्व तयारी झाली होती परंतु मनाच्या विरोधात काही गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेत अशोक अण्णांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.


यावेळी जनार्दन टोपले, विजय पाटील, ओमकार माद्याळकर, अष्कर लष्करे, सना चाँद, आकाश शिंदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. अनिल देशपांडे, अनिकेत चराटी, सिकंदर दरवाजकर, दशरथ अमृते, डॉ. इंद्रजीत देसाई, शरीफ खेडेकर,महमद दरवाजकर यांच्यासह ताराराणी आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!

📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular