आजरा ( अमित गुरव ) -:
आजरा तालुक्यातील एम.आय.डी.सी. परिसरात श्रीराम अॅग्रो इंडस्ट्रिज कारखान्यात काल मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अंदाजे 9 ते 10 चोरट्यांनी कारखान्याच्या परिसरात जबरदस्ती प्रवेश करून कामगारांना मारहाण केली. या घटनेमुळे आजरा MIDC परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती
➡️ फिर्यादी : शिवाजी रामचंद्र पाटील (वय 57, रा. आदाळ , ता. आजरा, जि. कोल्हापूर)
➡️ गुन्हा दाखल : भारतीय दंड संहिता कलम 312 अंतर्गत, आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. 225/2025
➡️ आरोपी : अज्ञात 9 ते 10 चोरटे
➡️ घटना घडली : 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 28 ऑगस्ट रोजी पहाटे 12.30 वाजता
➡️ ठिकाण : श्रीराम अॅग्रो इंडस्ट्रिज, आजरा MIDC

चोरट्यांनी कारखान्यातील कामगारांना मारहाण करत लहान बंदुकीच्या धाकावर त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर कारखान्याच्या परिसरातून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे कामगार भयभीत झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांची कारवाई
आजरा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि यमनर सो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



