Homeघडामोडीआजरा तालुक्याचे तीन तुकडे… राजकीय अन्याय थांबवा – उद्योजक कोंडूसकर यांचा संतप्त...

आजरा तालुक्याचे तीन तुकडे… राजकीय अन्याय थांबवा – उद्योजक कोंडूसकर यांचा संतप्त सवाल

आजरा ( प्रतिनिधी – हसन तकीलदार ):
“आजरा तालुका नशीबवान की कमनशिबी?” – हा प्रश्न सध्या तालुक्याच्या राजकीय नकाशावर उभा राहिलेला आहे. निवडणूक आयोगाच्या परिसीमन धोरणांमुळे तालुक्याला वारंवार झटके बसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्योजक प्रकाश कोंडूसकर यांनी तालुक्यावरील अन्यायाविरोधात तीव्र भावना व्यक्त करत राजकीय नेते, कार्यकर्ते व जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

पूर्वी चंदगड मतदारसंघात समाविष्ट असलेला आजरा तालुका संपूर्ण हक्काचा आमदार मिळवत होता. परंतु सध्याच्या परिसीमनानुसार आजरा तालुक्याची विभागणी भुदरगड, चंदगड आणि कागल या तीन मतदारसंघांमध्ये करण्यात आली आहे. परिणामी तालुक्याचा विकास तुटक, असमतोल आणि दुर्लक्षित झाला आहे, असा ठपका कोंडूसकर यांनी ठेवला.

नगरपंचायत स्थापनेचा नवीन झटका
तालुक्याला पुन्हा झटका बसला आहे, तो म्हणजे आजरा नगरपंचायत स्थापनेमुळे झालेली नागरी मतदार कपात. या बदलामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांवरही गंडांतर आले असून, तालुक्याच्या एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत गणांची कपात झाली आहे.

कोंडूसकर म्हणाले, “तालुका डोंगराळ, दुर्गम, आणि विरळ लोकवस्ती असलेला असूनही, त्याला स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ देण्याऐवजी विभागणी केली जाते. हे केवळ आजऱ्याच्या जनतेवर अन्याय नसून, लोकशाहीवर आघात आहे.”

जनगणना कुठली? माहिती द्यावी!
शासनाने लोकसंख्या आधारे परिसीमन केल्याचा दावा केला असला तरी, शंभरपेक्षा अधिक वाड्या-वस्त्यांचा नवा विकास झाल्याची वस्तुस्थिती कोंडूसकर यांनी मांडली. “कोणत्या जनगणनेच्या आधारे ही मोजणी झाली?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पारदर्शकता व उत्तरदायित्वाची मागणी केली आहे.

नेते, पत्रकार, जनतेनी एकत्र यावे
“आजऱ्याच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे स्पष्ट करत कोंडूसकर यांनी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना आणि सुज्ञ नागरिक यांना तालुक्यावर होणाऱ्या राजकीय अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular