कोल्हापूर :महाराष्ट्र शासनाने मार्केटसेस २५ पैसे ते ५० पैसे असा अध्यादेश दि १०/१०/२०२४ रोजी काढून तो अध्यादेश परत २४ तासात बदलून ७५ पैसे ते १०० पैसे असा बदलून व्यापाऱ्यांची घोर फसवणूक व निराशा केली त्याचा निषेध करणेसाठी व याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी धान्य , मिरची , गुळ , भाजीपाला , शेंगदाणे फळे , रवा मैदा , ड्रायफूट्स व मसाला अशा सर्वच प्रकारचे शेती उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनाची बैठक दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोशिएशच्या समागृहामध्ये कोल्हापूर चेंबर्स ऑफ काँग्रेसचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली पार पडली.
जुलै २०१७ मध्ये एक देश एक कर अशा स्वरूपाची जीएसटी कर प्रणाली सरकारच्या वतीने अंमलात आणली .अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तू वरती जीएसटी लागू केल्याने मार्केट सेस मधुन व्यापारी वर्गाला मुक्तता मिळेल असे आश्वासन देऊन व्यापारी वर्गाची फसवणूक केली होती. केलेल्या फसवणूककीला वेगळे वळण देऊन वेगवेगळे तर्कवितर्क निर्माण केले आणि व्यापारी एकजुठ मोडत काढण्याचा प्रयत्न केला आणि मार्केटसेस व जी एस टी अशा दोन्ही जाचक कराची वसुली करण्यास सुरुवात केली कर देण्यास विरोध नसुन या जाचक व अन्यायकारक करातून सूट मिळावी. व्यापार हा व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातुन सुलभ व्हावा अशी व्यापाऱ्याची मापक अपेक्षा होती. त्यासाठी महाराष्ट्र चेबर्स ऑफ कॉमर्सच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने केली गेली त्यांचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र चेबर्स ऑफ कॉमर्स यांच्या नेतृत्वाखाली २७ऑगस्ट २४ रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता सरकारने व्यापाऱ्याची एकजुठ बंदचे गांभीर्य ओळखून व्यापाऱ्यांच्या या विषयावर चर्चा करण्यासाठी एक कमिटी स्थापन करून कमिटी मध्ये काही व्यापारी प्रतिनिधीना सामिल करून व्यापाऱ्याची एकजुठ मोडीत काढली.जाचक अटीतून मार्ग काढू असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी व व्यापाऱ्याना खुश करण्यासाठी गुरुवार दिनांक १०/१०/२०२४ रोजी एक परिपत्र काढून मार्केट सेस शेकडा१% असणारी (बाजार समिती फी) ०:२५ ०:५० केले परंतु दोनच दिवसांत सत्ताधारी सरकारने काढलेला आदेश मंगळवार दि १५/ १० /२०२४ रद्द ठरवत पूर्वीप्रमाणे मार्केट सेस वसुल करण्यासाठी अध्यादेश काढला. त्यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या असून वर्गात कमालीची निराजी पाहवयास मिळाली. आजच्या बैठकीमध्ये मार्केट सेस गोळा न करणे व न भरणे या मतावर सर्वांनी ठाम निर्णय घेतला असून राज्य सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी मार्केट सेस जोपर्यंत रद्द केला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू ठेवण्याचा निर्धार व्यापारी संघटनांनी घेतला आहे.
यावेळी दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोचे अध्यक्ष संजीव परीख कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समेितीचे संचालक कुमार आहुजा मसाला व ड्रायफूट्सचे अजित करांडे, सांगली चेबर्स अध्यक्ष अमर देसाई, फूट मर्चंट चे साहिल बागवान इलेक्ट्रिकल असो चे अजित कोठारी, संपत पाटील, विजय कागले, धन्यकुमार चव्हाण, किरण तपकीरे, सुरेश लिंबेकर , श्रीनिवास मिठारी, राहुल नष्टे, अभयकुमार अथणे विवेक नष्टे, नयन प्रसादे संतोष लाड, गणेश सन्नकी, किशोर तांदळे, अमित खटावकर, भरतभाई शहा, सिद्धार्थ कापसे, विशाल
कोगनोळे, यांच्यासह व्यापारी मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते
स्वागत श्री विवेक शेटे यांनी केले आभार बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष श्री वैभव सावर्डेकर यांनी मानले
मुख्यसंपादक