आजरा(हसन तकीलदार ) :-गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेच्या कु.स्वराज प्रवीण निंबाळकर व विवेक धनाजी पाटील (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्यामुळे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड होवून त्यांचे पाच दिवसांच्या अभ्यास सहली करीता बेंगलोर येथे प्रयाण झाले . या यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी , सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य श्री आर जी कुंभार, नूतन प्राचार्य श्री एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, वर्ग शिक्षक सौ पाटील ए डी , विषय शिक्षक श्री गुरव पी एस, श्री चौगुले व्ही ए, श्रीमती कुंभार एस के यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा कोल्हापूर दक्षिण चे आमदार मा. श्री . अमल महाडीक यांच्या शुभ हस्तेही त्यांच्या या अभ्यास दौऱ्याच्या प्रयाण दरम्यान कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.
आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
व्हाट्सअँप चॅनेल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक