आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्यामध्ये आज घरोघरी आणि विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं जल्लोषमय आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. ढोल ताशाच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अगदी थाटामाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरु आहे. गणरायाच्या भक्ती सागरात गणेशभक्त न्हाऊन निघालेले मनोहर चित्र आजऱ्याच्या कुंभारगल्लीत दिसत होते.
गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया म्हणत कुंभारगल्लीतून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती डोक्यावरून नेतानाचे दृश्य लक्षवेधी दिसत होते. सर्वत्र हर्षउल्हास दिसून येत होते. बालचमूसह घरातील तरुण आणि थोर मंडळी बाप्पाला घरी नेण्यात मग्न होती. उत्सवमूर्ती थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत. आजऱ्यात गल्लोगल्ली, घरोघरी आणि विविध मंडळात भक्तीभावाने आणि हर्षउल्हासात गणपती बाप्पाचं आगमन झाले. आनंदपर्वाची गणेशचतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना करून सुरवात झाली. घरोघरी चैतन्यपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ अक्षरशः फुलून निघाली होती. भक्तगण, युवक, युवती, लहान थोर मंडळी पारंपरिक पेहराव परिधान करून बाप्पाच्या मूर्तीला भक्तीभावाने घेऊन जात होते. गणपती बाप्पाच्या आगमनाने प्रत्येक घरात मंगलमय वातावरण झाले असून प्रत्येक ठिकाणी आनंद, भक्ती आणि उत्साह यांचा संगम बघायला मिळत आहे. बाप्पा मोरयाच्या गजरात रस्ते, गल्लीबोळ आणि कॉलन्या दुमदुमून गेल्या.

आजरा अन्याय निवारण समितीने कालच वाहने पार्किंग नियोनाबाबत आजरा पोलीस ठाण्याला निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस खात्यामार्फत पार्किंग बाबत तसेच वाहनांच्या मार्गक्रमणाबाबत योग्य व नेटके नियोजन केल्यामुळे वाहतुकीस कोणतीही अडचण आली नसलेचे दिसून आले. सहाय्य्क पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वात चोख नियोजन बंदोबस्त करण्यात आले आहे.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



