अमित गुरव ( भादवण ) – : महिलांना १५०० रुपये दिले यामुळे ओरड करणाऱ्या काँग्रेस , शरद पवार गट तसेच विरोधकांना सावत्र भावाची उपमा देत तुमच्या सख्या भावाला मतदान करा असे भावनिक आवाहन नाम मुश्रीफ यांनी केले. बांधकाम कामगार , रुग्णसेवा , तसेच इतर सर्व बाबीचा आणि विकास कामांचा आढावा घेत विरोधकांचा समाचार घेतला.
देवेंद्र फडणवीस यांना वाटले हा गोरा गोमटा राजाचा पोरगा भाजप हा पक्ष वाठवेल पण त्याने तर दुसरीकडेच उडी घेतली असा नाव न घेता टोला समरजीत घाटगे यांना लगावला. गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम त्यांनी केली . मला आणि माझ्या कुटुंबीयांना इडी लावली. त्यावर त्यांनी एक कहरच केला कांबळे कुटुंबीयांना शाहू महाराज यांनी दिलेली साडे पाच एकर जमीन सत्तेचा गैरवापर करून आणि तहसीलदारांना हाताशी धरून काबीज केली. याशिवाय त्यांच्या पत्नीचे अमली पदार्थ हे प्रकरण आहेच त्याचे त्यांनी अद्याप कोणतीही उत्तर दिले नाही. राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होणारच पण त्याचे खंडन करून त्यांनी माझ्याप्रमाणे जनतेतील गैरसमज दूर केला पाहिजे असा विचार श्री. मुश्रीफ यांनी घाटगे यांना दिला. माझ्याकडे पूर्वीचे आहे तेच घर आहे बंगला बांधला नाही असा टोला भादवण येथे का आणि कोणाला लावला असेल हा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आहेच.
नाम. हसन मुश्रीफ यांचे संपुर्ण भाषण पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करावी .
https://www.facebook.com/share/v/185UCArGhi
प्रास्ताविक बी. टी . जाधव यांनी केले. तर महिला जिल्हा अध्यक्षा सौ. फराकटे यांनी महिलांना संबोधित केले. महाडिक गटाचे संजय केसरकर यांनी भादवण मधील ७०% मतदान तुम्हालाच मिळेल नाहीतर पुन्हा या स्टेज वर नसेन असा विश्वास व्यक्त केला. या पेक्षा अधिक मतदान जर कोणी देणार असेल तरच सामील व्हा असा सल्ला कोणाचे ही नाव न घेता दिला पण हा सल्ला होता की टोला आणि कोणासाठी हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला. श्री. मुश्रीफ यांचे काम चांगले असून त्यांना निवडून देण्याचे आवाहन अशोक चराटी यांनी केले.
एका शेतकरी मतदाराने शेतकऱ्यासाठी काय केले असा प्रश्न थेट श्री . मुश्रीफ यांच्या भाषणादरम्यान केल्याने प्रमुख कार्यकर्त्यांची मात्र भंबेरी उडाली पण त्यातून सावरत त्यांनी त्या बळीराजाला बाहेर नेऊन समजावले . तरीही अशी खदखद व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्याची जोरदार चर्चा डेअरी मध्ये जाता येता ग्रामस्थ करीत आहेत.
यावेळी साखर कारखाना संचालक राजेश जोशिलकर, वसंतराव धुरे , सुधीर देसाई , मारुती घोरपडे , संजय गाडे, विष्णू मुळीक, टी.जी , सुतार , विजय माने , आदिनाथ केसरकर , मारुती कांबळे , शंकर कांबळे, सुनील जोशिलकर, डॉ. गोपाळ केसरकर , दत्तात्रय जाधव , सदाशिव पाटील , विजय खुळे, नितीन केसरकर , अभिजित येजरे , दशराज आजगेकर तसेच भादवण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यसंपादक