अमित गुरव – आज प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. नाम. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या प्रचार सभा उत्तूर मतदार संघात अनेक ठिकाणी झाल्या . सर्वात मोठी गावे म्हणून उत्तूर आणि भादवण मध्ये जंगी सभा आयोजित केल्या गेल्या आणि दोघांच्या सभेमध्ये गाव प्रमुखांनी आपल्या आपल्या सभेत भरगच्च गर्दी केली होती. ती गर्दी कोणी कशी केली हा संशोधनाचा भाग आहे त्यात आता जायला नको.
उत्तूर मतदासंघांपैकी अनेक गावात श्री. मुश्रीफ यांनी गावप्रमुखाना तर आपल्या सोबत जोडले . पण श्री . घाटगे यांनी गावातील उपनेत्याना आणि मतदारांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे गाव प्रमुख एकीकडे तर मतदार दुसरीकडे ? असा प्रकार त्रयस्त म्हणून पाहताना दिसतो. त्यामुळे मतदारसंघात ५०-५०% मतदान होईल असं सध्या तरी वाटतं. असे झाले तर श्री. मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात मोठे खिंडार पडले आहे हे सिद्ध होईल. काही जाणकार तर सांगतात की , ५० % सोडा पण ४०%+ जरी उत्तूर मतदारसंघात मतदान श्री. घाटगे यांना पडले तरी घड्याळ थांबेल अशी कट्यावर चर्चा रंगत आहे.
चौकट -:
मंडलिक गट नेमका कोणाला मदत करणार ह्यावर कागल मतदारसंघ आमदारकीचा कौल बाजी मारेल का हे येत्या काही दिवसांत समजेल.
मुख्यसंपादक