आजरा (हसन तकीलदार ):-प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक कॉलनीच्या विविध प्रश्नांना आणि समस्यांना घेऊन आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने लढा दिलेला आहे. येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. आजरेकरांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दि. 15/06/2025 रोजी आजरा अन्याय निवारण समितीची बैठक पार पडली. याबैठकीत नगरपंचायत निवडणूक 2025 च्या संदर्भात विविध मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक रिंगणात कशा पद्धतीने उतरायचे… यावेळी बैठकीत अन्याय निवारण समिती नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 17 जागावर आपले उमेदवार उभे करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
जनतेच्या विविध प्रश्नावर प्रभाविपणे लढा देण्यासाठी तसेच विकासाचा पर्याय ठरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.जनतेच्या हितासाठी पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आणि विकासाभिमूख प्रशासन देण्याचा संकल्प समितीने यावेळी व्यक्त केला. यावेळी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक