गडहिंग्लज -: मौजे हिटणी आणि मुत्नाळ ता. गडहिंग्लज या दोन गावांतील तरुण वर्गाने आपल्या भविष्याच्या उन्नतीसाठी आणि रोजगाराच्या संधींच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील तरुणांमधील आशा व भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले .ज्यामुळे तरुण वर्गाला आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन साधता येईल त्यांनी ग्रामीण विकासाच्या योजना, उद्योग प्रोत्साहन आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे या गावांतील तरुणांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले या कार्यामुळे, हिटणी आणि मुत्नाळ या गावांतील तरुण युवकांना आत्मनिर्भरतेची प्रेरणा मिळाली आहे.
त्यांनी मानसिंग खोराटे यांच्या पुढील विधानसभेतील प्रयत्नांना समर्थन देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यामुळे मानसिंग खोराटे यांना त्यांच्या आगामी विधानसभेतील निवडणुकीसाठी मोठे समर्थन मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.तरुण वर्गाच्या या सक्रिय समर्थनामुळे मानसिंग खोराटे यांना त्यांच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत एक आत्मविश्वास मिळाला आहे. या समर्थनामुळे भविष्यात हिटणी आणि मुत्नाळ या गावांमधील विकास कामांना गती येईल आणि त्या परिसरातील जीवनमानात सकारात्मक बदल होईल, अशी आशा मानसिंग खोराटे व्यक्त केली.
यावेळी युवराज नाईक ग्रामपंचायत सरपंच अजित धुराज अक्षय पाटील गणेश जापुरे ,विनायक कोळी, विनायक मिरजे ,आकाश चिकोडी प्रज्वल गायकवाड, दयानंद कोळी आदी उपस्थित होते

मुख्यसंपादक