ग्रामीण बालकलाकारांना चित्रपटसृष्टीत संधी – अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे यांचे मत
उतूर ( अमित गुरव ) | डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उतूर) यांच्या वतीने आयोजित “कलाकार आपल्या भेटीला – कलाकारांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद” ही कार्यशाळा वसंतरावदादा पाटील विद्यालयात उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की,
“ग्रामीण भागातील बालकलाकारांमध्ये अफाट क्षमता आहे. भविष्यातील मालिका आणि चित्रपटांसाठी त्यांना नक्कीच संधी दिली जाईल. डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक मोठं व्यासपीठ आहे.”
झी टीव्हीवरील होम मिनिस्टर फेम एन. के. बाबा यांनी स्वतः लिहिलेलं गाणं सादर करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांनी सांगितलं की, “ध्येय, जिद्द आणि परिश्रम यांच्या जोरावर ग्रामीण भागातूनही मोठमोठे कलाकार घडू शकतात.”
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. कांबळे होते.
प्रमुख पाहुण्यांमध्ये युवा उद्योजक अश्विन भुजंग, ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा दोरुगडे, तसेच लोककला महोत्सव समिती कार्याध्यक्ष गणपती नागरपोळे यांचा समावेश होता.
आयोजकांचे मनोगत
डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. सचिन पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मुख्याध्यापक एच. एस. कांबळे आणि संदेश रायकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन
सूत्रसंचालन – एच. एस. हळवणकर
आभार – ए. व्ही. गुरव मॅडम
कार्यक्रमाला शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ताज्या मराठी घडामोडी आणि नानाविध व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच Link Marathi चॅनेल Subscribe आणि Follow करा!” 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



