Homeघडामोडीमैत्रा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय षटकोळी काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहिर.

मैत्रा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय षटकोळी काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहिर.


(प्रतिनिधी)- मैत्रा फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे कर्तृत्व महान या विषयावर राज्यस्तरीय भव्य षटकोळी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती .नुकताच या स्पर्धेचा निकाल मैत्रा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.द.ल.वारे यांनी जाहीर केला .ही स्पर्धा कवयित्री श्रीमती संध्याराणी कोल्हे यांनी निर्मिती केलेल्या षटकोळी या काव्यप्रकारावर आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे सर्वोत्कृष्ट- प्रतिभा बोबे ,उत्कृष्ट- भावना गांधिले प्रथम-अनिता कांबळे व राजश्री विरुळकर,
द्वितीय-सारिका बोबे व रत्नाकर पाटील
तृतीय-एन.आर.पाटील,शैला जोशी,अनुराधा उपासे
शिवहार कावरे यांना देण्यात आला.

स्पर्धा प्रमुख म्हणून संजय राठोड जिल्हाध्यक्ष मैत्रा फाऊंडेशन, राजश्री लाहोर राज्य समन्वयक तसेच स्पर्धा संयोजक म्हणून संगीता आदमाने व अश्विनी शिंदे उपाध्यक्षा यांनी काम पाहिले. सर्व कवितांचे परीक्षण कवयित्री श्रीमती संध्याराणी कोल्हे यांनी केले.


सर्व विजेत्यांचे मैत्रा फाऊंडेशनचे संस्थापक पदाधिकारी द.ल.वारे, हर्षा ढाकणे, शितल बळे, उज्वला वनवे, माधुरी कोटूळे, सरिता नाईकवाडे, उषा लोंढे तसेच कचरू तुपे, विकास घोडके ,नितीन फसले, फुलचंद खाडे, आशा भोसले, आशा भारती, अनिता खाडे, अनुराधा धनेश्वर, अनिता जोगदंड, शोभा दळवी, शिल्पा वाघमारे ,सविता ढाकणे, विष्णू चौधरी, तुकाराम राठोड, गोविंद ठोंबरे यांनी अभिनंदन केले आहे.

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular