Homeघडामोडी“ ग्रामपंचायत कार्यालय सील केलं… पण रात्री 8 दरम्याने अचानक सील तोडून...

“ ग्रामपंचायत कार्यालय सील केलं… पण रात्री 8 दरम्याने अचानक सील तोडून अधिकारी आत! पुढे नेमकं काय घडलं ? ”


आजरा -: हाजगोळी खुर्द ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत कार्यालय सील करण्यात आले होते. मात्र, आज रात्री सुमारे 8 च्या दरम्याने सील तोडून अधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले.
१५ ऑगस्ट रोजी झालेल्या गावसभेत ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ग्रामसेवकांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करतात, मासिक सभेच्या नियमानुसार नोटिसा दिल्या जात नाहीत आणि सदस्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, अशा विविध तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या.


या तक्रारींच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देत ग्रामपंचायत कार्यालय सील करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी काही ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत कार्यालय सील केले होते. या प्रकरणाची कार्यालयीन चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
दरम्यान, आज रात्री सुमारे ९ वाजता सील तोडून अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. याची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यालय परिसरात जमा झाले. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र निषेध व्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
घटनेमुळे काही काळ ग्रामपंचायत कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सील कोणत्या आदेशाने आणि कोणत्या कारणास्तव उघडण्यात आले, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण काय येते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात ग्रामस्थांच्या तक्रारी, कार्यालय सील करण्याची कारवाई, त्यानंतर सील उघडण्याची घटना आणि पुढील चौकशी यामुळे हाजगोळी खुर्द ग्रामपंचायतीचा विषय चर्चेत आला आहे.

“या प्रकरणातील पुढील अधिकृत अपडेट्स आणि स्थानिक घडामोडींसाठी @amitguravofficial सोबत जोडलेले राहा.”

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular