पूर्वीच्या काळात आयुर्वेदिक औषधे वनस्पती पासून तयार केली जात होती. त्यावेळी अशा आयुर्वेदिक औषधाने उपचार करणारे वैध, हकिम , असे लोक वैद्यकीय सेवा आपले परम कर्तव्य म्हणून पार पाडत होते. लोकसंख्या कमी असल्यामुळे अशी उपचार पद्धती जंगले अस्तित्वात असल्याने मुबलक औषध देणारी औषधी वनस्पती आणि त्या वनस्पतींची पारख करणारे लोक उपचार साधा होता पण गोरगरीब लोकांना परवडणारा होता; पैश्याची ओढ नाही, आत्ता असणारे भयानक आजार तेव्हासुद्धा होतें फक्त त्यांची नावे वेगळी होती. प्लेग पटकी, हिवताप ,मलेरिया, काविळ, डेंग्यूचा ताप, एनफुलेंगजा, विविध तापाचे आजार, विविध हाडांचे आजार, विविध पोटाचे आजार , विविध त्वचेचे आजार, असे मानवी अवशेषानुसार भयानक आजार तेव्हासुद्धा होतें. त्यावेळी असे काही आजार होते की पूर्ण गावच्या गावं मरायची. त्यावेळी सुध्दा माणसांचे अपघात होत होते. हातापायाचे हाड मोडणे , असे होत होते मग त्यावेळी असणार्या औषधी वनस्पती यांच्या वापराने हे सर्व आजार बरे होत होतें. पण आत्ता आहेत तसे मोठे दवाखाने नव्हते. महिलांचे विविध शारीरिक आजार यासाठी सुध्दा त्यावेळी दवाखाने नव्हते महागडी औषधे नव्हती तरी सुद्धा लोक आजारी पडत होतें आणि लवकर बरे होत होते.
काळ बदलला आणि जंगले संपली आपल्याला निसर्गाने दिलेल्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांच्या ऱ्हास झाला. वैध , हकिम यांचे रुपांतर डॉक्टर या मोठ्या नावात झाले. उपचार पद्धती बदलली, घरात होणारे उपचार दवाखान्यात भाड्याच्या खाटेवर होण्यास सुरुवात झाली. आयुर्वेदिक औषधांची जागा इंग्रजी औषधांनी घेतली. द्रवरुप औषध होतें त्यांचे रुपांतर गोळ्या, कॅपसूल मध्ये झाले. लहान लहान असाणारे दवाखाने हे टोलेजंग इमारती तयार झाल्या. त्याप्रमाणे औषधांची किंमत दवाखान्याची फी दवाखान्यात कोणत्या आजाराला किती खर्च ? कोणत्या औषधांचे बिल दर किती ? यांचा कोठेही उल्लेख नाही. मनमानी दराने उपचार पद्धती अवलंबली जाते. कारणं माणूस आजच्या काळात जेवनाशिवाय राहू शकतो पण औषधाविना नाही. कारणं त्याला कारणीभूत आपली जीवन शैली. व्यायाम नाही, एकाजागी बसून काम, अनियमित पणे वेळी अवेळी जेवण, झोपेचा अभाव, मानसिक तणावाखाली , फळें फुले भाजीपाला यांवर केमिकल वापर. कमी वेळेत तयार होणारें अन्न धान्य , सायकल गेली गाडी आली त्यामुळे चालन थांबल. त्यामुळे साखर , बी पी, मधूमेह, थाॅयराईड, त्वचेचे विकार, वजन वाढणे, अवेळी अवयात केस पांढरे होणे, डोळ्यांचे आजार , गुडघे कंबर दुखणे. मनोविकलांग, मानसिक दुर्बलता, शारीरिक दुर्बलता, असे एक नाही अनेक आजाराने आजची पिढी ग्रासली आहे. त्यामुळे अशा वेळेचा, अशा लोकांचा डॉ यांनी पूर्णपणे फायदा उचलला आहे कारण जेवढे आजार त्यावर तेवढेच दवाखाने आज तयार होत आहेत. त्याप्रमाणात औषधांचे भरमसाठ दर मनमानी पद्धतीने फि वसुली. आज अनेक वेळा विविध मागण्यासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज दाखल झाले मोठमोठी आंदोलन झाले. पण आजपर्यंत औषधांच्या दरासाठी किंवा डॉ यांच्या दवाखान्याच्या बिलासाठी , फिसाठी कोठेही आंदोलन झालेले आहे असे बघण्यात नाही. कारणं माणूस आहे तो आजारी पडणार आहे त्याला औषधांची गरज आहे. म्हणूनच आपण आजपर्यंत औषधांसाठी खर्च करत आलो आहे आत्तापर्यंत झाले नाही आत्ता करण्याची गरज आहे .
मानव दोन ठिकाणी आपले हात जोडतो एक देवाजवळ कारणं त्याने जीवन दिलें म्हणून. आणि दुसरे डॉक्टर जवळ कारणं डॉ. आपले जीवन वाचवतो. अपूरा निवारा साधन, कुपोषण, दारिद्रय , यामुळे आरोग्याची हेळसांड होणे अनेकांच्या नशिबी येते. शुध्द पाण्याचा अभाव यामुळे विविध साथीचे आजार रोग यांचें थैमान यांना सामोरे जावे लागते अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे औषधपाणी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण या सर्वांहून महत्वाची गोष्ट म्हणजे तज्ञ वैद्यकिय सेवा आणि औषधें या सुविधा बहुसंख्यांक लोकांना मिळतच नाहीत. खेड्यात डॉ नर्स नसणे , लहान दवाखान्यात शस्त्रक्रियेची साधने नसणे, शहरांमधील सरकारी दवाखान्यात रोग्याच्या कडे दुर्लक्ष होणे त्यांना वेळेत आरोग्य सेवा न देणे , औषधांचा दर्जा कनिष्ठ असणे. या सर्व गोष्टी आपल्याला परिचयाच्या आहेत त्याचबरोबर वातानुकूलित टोलेजंग खाजगी दवाखाने. भरमसाठ फी आकरणारे निष्णात तज्ञ श्रीमंत लोकांसाठी असणार्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा याही गोष्टी आपण पाहतोच. राजकीय नेते पुढारी यांना उच्च प्रतिची वैद्यकीय सेवा दिली जाते. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता , किमान वैद्यकीय सेवा आणि स्वस्त औषधें उपलब्ध कशी करून द्यायची हा आपल्यापुढे एक मोठा प्रश्न असतो. त्यासाठी जीवरक्षक औषधांच्या किंमतीवर मर्यादा घातल्या जातात. औषध उपचारांचा खर्च भरून दिला जातो. सरकारी दवाखान्याचा व्याप वाढवला जातो. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्या जातात. रोगप्रतिबंधक लस टोचणयाचे कार्यक्रम घेऊन रोग निर्मूलनाचे प्रयत्न केले जातात. या सर्वांमुळे किमान आरोग्यसेवा सहज मिळावी अशी अपेक्षा असतें. आरोग्य सेवेच्या प्रतीमधये असणारा फरक मात्र कायमच राहतो. तसेच कित्येक सुविधा प्रामुख्याने मध्यमवर्गीय नोकरदारांना मिळतात. रोजंदारी , बांधकाम कामगार , हातावर चे पोट असणारे लोक , असंघटित सर्व विभाग, गरिब स्तरातील महिलांना , बालकाना, नोकरदार सारख्या सुविधा मिळत नाहीत ही आपल्या बरोबर केवढा मोठा दुजा भाव आहे हे बघा. शिवाय महिलांची आरोग्याची तर जास्तच हेळसांड होते. त्यांच्या आरोग्य शिक्षणासाठी स्वतंत्र आणि प्रभावी अशा यंत्रणा अभाव आहे .
सर्वांना आरोग्य सेवा हे ध्येय गाठण्यासाठी सरकारी दवाखान्याची क्षमता वाढविण्यासाठी सरकार प्राधान्याने पैसा वापरत नाही; त्याऐवजी उच्च तंत्रज्ञान असणार्या खाजगी दवाखान्याकडून काही ठराविक सेवा या योजनेअंतर्गत सरकार विकत घेऊन त्या गरिब जनतेला उपलब्ध करून देत आहे. अशा धोरणामुळे सरकारी सेवा दवाखान्यात सुधारायला सरकारकडे पुरेसा पैसा शिल्लक राहतं नाही प्रत्त्येक भारतीय व्यक्तिला गरजेप्रमाणे दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा पुरविणारी व्यवस्था अमलात आणण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने आरोग्य सेवेच्या हक्काचा कायदा करण्याची गरज आहे. सरकारी खर्चात वाढ करा. आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. औषध तुटवडा कमी करण्याची गरज आहे. समग्र माणूस बळ तयार करून. वैद्यकीय सेवेचे खाजगीकरण कंत्राटीकरण थांबविणे गरजेचे आहे.
औषधांची किंमत ज्या दवाखान्यात उपचार घेतला त्याचे औषध त्याच दवाखान्याच्या मेडिकल मध्ये घेणे बंधनकारक नाही कारण त्या औषधांची किंमत मनमानी दराने लावली जाते उपचार पद्धती कोणती , उपचार खर्च, आपल्याला पाहिजे तशी वैद्यकीय मदत मिळणे आपला अधिकार आहे.
आत्ता आजपर्यंत जे झाले नाही ते आत्ता आपणांस करण्याची गरज आहे म्हणजे आंदोलन औषधांच्या दरासाठी. आंदोलन डॉ मनमानी कारभारासाठी , आंदोलन रुग्ण हक्क सनद प्रमाणे सर्व अंमलबजावणी होण्यासाठी आत्ता आंदोलन झालेच पाहिजे. मग उठा निःसंकोचपणे विचारा. एकत्र या नाहीतर हे सर्व डॉ आपली जन्माची संपत्ती जमापूंजी हडप केल्याशिवाय राहणार नाही
- अहमद नबीलाल मुंडे
( रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा )
मुख्यसंपादक