Homeघडामोडीआजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

आजरा (अमित गुरव ) – दि आजरा अर्बन को- ऑप.बँक आजरा (मल्टी -स्टेट ) ची सुवर्णमहोत्सवी बँकेची सर्वसाधारण सभेचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश डांग होते. सभेत बिनविरोध सभेची माहिती सहाय्यक निबंधक अरुण काकडे यांनी दिली.
सुरेश डांग, शैला टोपले तर अशोक काशिनाथ चराटी, विलास नाईक , प्रकाश वाटवे , डॉ.दीपक सातोसकर , डॉ. अनिल देशपांडे , रमेश करुणकर , किशोर भुसारी , बसवराज महाळँक , मारुती मोरे , आनंदा फडके , अनिता सबनीस , सुनील मगदूम , सूर्यकांत भोईटे , किरण पाटील , प्रणिता केसरकर , संजय चव्हाण ह्या संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. असे काकडे यांनी जाहीर केले. ह्या संस्थेची नवनिर्वाचित संचालकांचा बँकेचे प्रशासकीय अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आण्णा भाऊ संस्थेचे प्रमुख अशोक चराटी यांनी १००० कोटींचा टप्पा पार करूया त्यात साथीने अडचणींवर मात करू असे म्हणत नूतन संचालकांचे अभिनंदन केले. नूतन संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.
तानाजी गोईलकर , लुईस शहा ( कायदेशीर सल्लागार ) , समीर , तानाजी जोशीलकर ( मुख्य व्यवस्थापक ), मिलिंद ओतरी , व सभासद उपस्थित होते.

चेअरमन पदी सुरेश डांग तर व्हा. चेअरमन पदी शैला टोपले यांची निवड एकमताने करण्यात आली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular