आजरा (अमित गुरव ) -: सिरसंगी ता आजरा येथे जंगल परिसरात आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले ;पण अडीच तासात काजूची तसेच स्थानिक झाडे व गवताच्या गंजा जळून खाक झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे 4 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तालुक्यातील जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनविभागाची डोकेदुखी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुख्यसंपादक