आजरा -: आजरा तालुक्यात ३१ ग्रामपंचायातीसाठी ७९.५७ टक्के मतदान झाले. तालुक्यात हाजगोळी खुर्द या ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक ९०.५१ टक्के तर सर्वात कमी मतदान ६७.२९ टक्के मासेवाडी या ग्रामपंचायतीसाठी झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आजरा येथे मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे सरबंळवाडी (६९.२५), कानोली (७४.५८), लाकूडवाडी (७४.६५), गजरगाव (७९.३५), सुळेरान (८४.५६), किटवडे (७७.२५), भादवणवाडी (८६.६३), मडिलगे (७६.०४), शेळप (८१.८७), सोहाळे (७७.९४), हाजगोळी खुर्द (९०.५१), उत्तूर (७४.९५), खानापूर (८१.१६), श्रृंगारवाडी (८६.१६), कोळिंद्रे (७५.१३), चितळे (८७.९८), बहिरेवाडी (७७.६५), पेंढारवाडी (८४.५९), मासेवाडी (६७.२९), वझरे (८३.८०), वडकशिवाले (७९.२८), भादवण (८२.२६), कोरीवडे (८६.९२), दाभिल (८७.८८), आर्दाळ (७८.३१), होन्याळी (८३.८६), धामणे (८४.५८), झुलपेवाडी (८७.३२), साळगाव (८९.४८), हाजगोळी बु (८०.६२), खेडे (७८.३९).
- Skyindianews
मुख्यसंपादक