Homeसंपादकीयआता दोर कापून टाकला आहे ; लढण्या शिवाय पर्याय नाही

आता दोर कापून टाकला आहे ; लढण्या शिवाय पर्याय नाही


शेतकरी बांधवांनो
जरा आत्मपरीक्षण करा आपल्यावर ही वेळ का आली आहे, आपण का कर्जबाजारी झालो आहोत. किती राब राब राबूनही का आपल्या हातामध्ये काही मिळत नाही. का आपल्या पोरांना चांगल्या शाळेमध्ये शिकवता येत नाही का मुलीचं लग्न मनासारखं स्थळ पाहून लावता येत नाही, आपले कुठे चुकत आहे आपलं अंतर्मन डोकवून पाहिलं तर नक्कीच आपला काहीतरी उत्तर मिळेल आणि हो आपल्या ते उत्तर शोधायचे आहे आता लढायचं आहे मरायचे नाही. तो दोर कधीच कापून टाकला आहे किल्ल्यावरून उडी मारून मरायचं नाही सरळ किल्लेदारांची लढून विजय मिळवायचा आहे. आपल्या हक्कासाठी आपल्या प्रश्नांसाठी वाटेल ते करायचं आहे बैला सोबत बैलासारखा राबून हाती काहीच उरत नाही हे सत्तेतले विरोधातले व्यवस्थेतले डोमकावळे ताजे होतात हे सर्व बदलण्यासाठी आम्हाला पांभ रीच्या चाड्यातुन चळवळीचे बीज पेरावे लागेल आणि क्रांती चे पीक घ्यावे लागेल त्याशिवाय तरणोपाय नाही .आपण संसदेत प्रतिनिधी पाठवतो या प्रतिनिधीला आपल्या प्रश्नांची जाण नसते आपल्या अडचणी काही कागदावरच्या तर काही बांधावरच्या असतात. निव्वळ निसर्गाच्या भरवशावर शेती करणं आता हीताच राहिलेलं नाही त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून विकासाच्या दिशेने आपल्याला गेले पाहिजे आमदार-खासदारांचे मनगट धरून त्यांना थांबवले पाहिजे. आपल्या समस्या आपल्या अडचणी रस्त्यावर उतरून मांडल्या पाहिजे आता आपल्यासाठी कुणी येईल काही करेल याची वाट पाहण्यात अर्थ नाही. स्वतःलाच आता स्वतःच्या लढाईसाठी तयार ठेवलं पाहिजे आपण शेतकऱ्याच्या घरांमध्ये जन्म घेतलाय ,आपण भाकरीचे झाड लावतो जगाच पोट भरतोय आपण चोरी करत नाही पाप करत नाही भ्रष्टाचार करत नाही. कुणाला आडवत नाही लोकशाहीच्या मार्गाने आपण जीवन जगतोय. या भारत मातेचे आपण पुत्र आहोत मग आपल्याला अशी वागणूक का हे प्रश्न आपल्याला सतत पडले पाहिजे पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आपला नेता चुकत असेल तर ती चूक सांगण्याचे धाडस झाले पाहिजे. आपली पोरं नेत्याच्या भाषणावर आणि क्रिकेटच्या चेंडूवर टाळ्या वाजवायला लागलीत आणि सगळा बट्ट्याबोळ झाला अशी बिना मनगटाची पोरं शेतकरी बापाच्या पोटी आली आणि संपूर्ण शेतीचा सत्यानाश झाला. आधीच लंगडत चालते शेती त्यात विरोधी कायदे अनेक बंधन लाखो समस्या अस्मानी-सुलतानी संकटावर संकट ,रासायनिक खतांच्या बी बियाणांच्या कीटकनाशकांच्या बेसुमार वाढलेल्या किमती मजुरांच्या समस्या अशा अनेक अडचणी तरीही कष्ट करून घाम जिरवून पीक घेणारा शेतकरी . तरी त्याचं कोणाला काहीच वाटत नाही, कष्ट केलेल वाया जातं किंवा मातीमोल भावाने विकले जातं तेव्हा हाताश झालेला शेतकरी आपला जीवन मार्ग संपवण्याचा विचार करतो मात्र मित्रहो असा कुठलाही विचार आता मनात आणू नका. कारण आता थेट किल्लेदारांची लढायचं आहे मारायचं आहे मरायचं नाही.


गड ही येईल आणि सिंह ही राहील

          संतोष पाटील 
         7666447112
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

 1. Sadhya bajaru patrakarita bhutek thikano pahayla milte tithe aapli patrikarita vishwasarh batate.karan aajparyant shetkaryachi fasavnuk v pilavnukch chalu aahe.dhanyvaad.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular